Morning Meditation: सकाळी मेडीटेशन करत असाल तर 'हे' नक्की वाचा

Morning Meditation: आपले मन अशांत होते आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावरदेखील होतो. असे होऊ नये यासाठी आपण खास खबरदारी घेणे, आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे महत्वाचे ठरते.
Morning Meditation
Morning MeditationDainik Gomantak

Morning Meditation: आपले रोजचे आयुष्य हे अधिकाधिक व्यस्त होत चालले आहे. नोकरी, घर, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये आपण अनेकदा स्वत:ला विसरुन जातो. मात्र सातत्याने कामाचा ताण, नात्यामध्ये येणारे चढउतार यांमुळे आपल्या स्वभावात चिडचिडेपणा येतो.

आपले मन अशांत होते आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या मानसिक आणि शारिरिक आरोग्यावरदेखील होतो. असे होऊ नये यासाठी आपण खास खबरदारी घेणे, आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे महत्वाचे ठरते. अनेक तज्ञ मेडिटेशनचा सल्ला देतात. अनेकजण आपल्या वेळेनुसार मेडिटेशन करत असतात मात्र सकाळी अथवा पहाटे मेडिटेशन करण्याचे काही फायदे आहेत. ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो.

१. तुमचा मूड चांगला राहतो

तुम्ही जर सकाळी मेडिटेशन करायला सुरुवात केली तर तुमचा दिवस अत्यंत चांगला आणि ऊर्जात्मक जातो. आशावादी आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात निर्माण होते. तुम्ही आनंदी राहता आणि मन शांत होते.

२. जाणीवा वाढतात

तुम्हाला काय वाटते. तुम्ही काय विचार करता. ते विचार चुकीचे आहेत की बरोबर याबद्दल तुम्ही जागरुक असता. तुमच्या भावना काय आहेत, याबद्दल जागरुकता वाढते. तुम्ही त्यापासून स्वत:ला दूर ठेवू शकता आणि तटस्थपणे त्याबद्दल विचार करु शकता.

३. ताणतणाव आणि काळजी करण्याची सवय दूर होते

सकाळी मेडिटेशन केल्याने तुमचा ताणतणाव कमी होतो. सतत गोष्टींबद्दल काळजी करण्याची सवय दूर होते.

४. कार्यक्षमता वाढते

तुम्ही जे दिवसभरात काम करणार आहात ते करण्याची तुमची क्षमता वाढते आणि त्यामुळे कामाची गुणवत्तादेखील वाढते.

Morning Meditation
Vastu Tips For Wealth: खिडकीसमोर कधीही ठेवू नका 'या' गोष्टी; नाहीतर घरात येऊ शकते दारिद्र्य

५. भावभावनांवर नियंत्रण

तुम्ही अनेकदा हे अनुभवले असेल की एखाद्या घटनेला, प्रसंगाला तोंड देताना आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकत नाही. यामध्ये अचानक रडू येणे, राग येणे, अत्यानंद होणे अशा भावनांचा समावेश होतो. मात्र रोजच्या मेडिटेशनने तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता.

६. लक्ष केंद्रित करण्यास मदत होते

अनेकांना वाढता ताणतणाव, काळजी , अतिविचार या सगळ्याचा परिणाम म्हणून एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. मात्र जर तुम्ही मेडीटेशन करु लागलात तर तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

७. आत्मविश्वास वाढतो

जर तुम्ही दररोज मेडिटेशन करत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. त्याचा परिणाम तुमचे आणि नात्यावर दिसतो. तुमच्या कामात आणि नात्यात सकारात्मकता येईल.

८. तुमच्यातील प्रेम आणि माया वाढते

जसजसे तुमचा ताणतणाव कमी होत जातो तसतसे तुमच्यातील माया आणि प्रेम वाढते. तुम्ही स्वत:ला आणि इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता.

किती वेळ करावे मेडिटेशन

तज्ञ सांगतात ते व्यक्तीपरत्वे बदलत जाते. सुरुवातीला तुम्हाला अडचणी येऊ शकतात मात्र रोजच्या सरावाने तुम्ही सराईतपणे मेडिटेशन करु शकता. दररोज सकाळी १५ मिनिटे मेडिटेशन केले तर तुमच्यामध्ये अनेक बदल दिसून येतात असे म्हटले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com