Mother's Day Recipes: आजच्या खास दिवशी आईसाठी बनवा स्वादिष्ट पदार्थ

मातृदिनानिमित्त बनवा झटपट तयार होणारे पदार्थ
Mother day 2022
Mother day 2022 Dainik Gomantak

आज मदर्स डे (Mother's Day) आहे आणि या दिवशी त्यांची मुले त्यांच्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात, त्यांना भेटवस्तू देतात, आजचा दिवस आनंदी करण्यासाठी फुले आणि गोडवा देतात. या दिवशी मातांना त्यांच्या मुलांकडून विशेष प्रेम मिळते आणि मुले देखील वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत झटपट आणि स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपीबद्दल... (happpy Mother'day 2022 Recipe News)

* चीज बटाटा

बटाटे सर्वांनाच आवडतात, पण सामान्य बटाट्याची भाजी बनवण्याऐवजी तुम्ही त्याला ट्विस्ट देऊन तुमच्या आईलाही खुश करू शकता.

* स्मूदी किंवा शेक

तुमच्या आईला जे फळ आवडते ते घेऊन मस्त थंड स्मूदी किंवा शेक बनवु शकता. वरण तुम्ही ड्रायफ्रुट्स आणि फळांचे बारीक तुकडे टाकून सजवून सर्व्ह करु शकता.

* पनीर टिक्का

पनीरचे चौकोनी तुकडे करून मॅरीनेट करा. मॅरीनेशनसाठी दही, आले-लसूण पेस्ट, लिंबाचा रस, मोहरीचे तेल, लाल तिखट एकत्र करून त्यात पनीर टाकून डिप फ्राय करावे. खायला हा पदार्थ चवदार आणि झटपट तयार होणार आहे.

Mother day 2022
Mother's Day: जर तुम्ही नोकरी करत असाल, तर कमाईचे 3 भाग करा

* वडा पाव

जर तुम्ही काही स्नॅक्स बनवायाचा विचार करत असाल तर वडा पाव बेस्ट पर्याय आहे. तुमच्या आईला मुंबईचे हे खास स्ट्रीट फूड नक्की आवडेल. विशेष म्हणजे ते पटकन बनते आणि चवदार देखील असते. वडा पाव सोबत कांदे, टोमॅटो, लिंबू आणि हिरवी मिरची घालून मसालेदार भेळपुरी देखील बनवू शकता.

* रबडी केक

जर तुम्हाला चविष्ट नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी काहीतरी गोड बनवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आईसाठी हा झटपट रेडीमेड रबडी केक बनवू शकता. तुमची खास लंच डेट रबडी केकने पूर्ण होईल. खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही वेगळ्या पदार्थाची गरज भासणार नाही आणि तो झटपट रबरी केक बनेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com