रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांना माझा सलाम, श्रीपाद नाईक

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

 कोविड महामारीच्या काळात डॉक्टर, पारिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता कोविड १९ ने ग्रासलेल्या रुग्णांची सेवा केली. त्या सर्वांना माझा सलाम, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज सकाळी खोर्ली - तिसवाडी येथील आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या गोमंतकीय कोविड योद्यांच्या सत्कार सोहळ्यात केले.

गोवा वेल्हा : कोविड महामारीच्या काळात डॉक्टर, पारिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता कोविड १९ ने ग्रासलेल्या रुग्णांची सेवा केली. त्या सर्वांना माझा सलाम, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी आज सकाळी खोर्ली - तिसवाडी येथील आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या गोमंतकीय कोविड योद्यांच्या सत्कार सोहळ्यात केले.

मातृभूमी सेवा प्रतिष्ठान पणजी आणि सांडू फार्मास्युटिकल्स लिमिटेड गोवातर्फे कोविड वॉर्रिएर्स ऑफ गोवा यांच्या सत्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत सांडू फार्मास्युटिकल्सचे मालक तथा संचालक उमेश सांडू, पीएचसी खोर्लीचे प्रमुख डॉ. केदार रायकर व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरवातीला आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, की डॉ. केदार रायकर यांच्या नेतृत्वाखाली पीएचसी खोर्ली तिसवाडीच्या कर्माचाऱ्यांनी केलेल्या कार्याची तुलना करणे योग्य नाही. त्यांचे कार्य खरेच कौतुकास्पद आहे.

यावेळी उमेश सांडू यांनीही आपल्या भाषणातून कोविड योद्यांच्या कार्याची स्तुती केली. डॉ. केदार रायकर यांनी आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे या आरोग्य केंद्राला नेहमीच सहकार्य लाभत आल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. मातृभूमी सेवा प्रतिष्ठान व सांडू लिमिटेडने सुरू केलेला हा कार्यक्रम स्तुत्य असल्याचेही ते म्हणाले.

खोर्ली आरोग्य केंद्राच्या कोविड योध्यांना प्रमाणपत्र व प्रतिकार शक्ती वाढविण्याऱ्या औषधांचे किट देण्यात आले. यात डॉ. केदार रायकर, डॉ. देवल नाईक, डॉ. सुबोध नाईक, डॉ. नेहाल फर्नांडिस, डॉ. योगेश देसाई, डॉ. रिशब डिसोझा रामनाथकर, डॉ. अरुण देसाई, डॉ. स्वाती रायकर, डॉ. सुप्रिया धोंड, डॉ. अक्षता तिळवे, डॉ. रिद्दी नास्नोडकर, डॉ. डोरेती कार्डोजो, डॉ. आकारशा नार्वेकर, अरुणा फळदेसाई, सुमन मडकईकर, अर्चना जुम्नेल, संजता माजीक, सुदिन फडते, गोदावरी गावस, शर्मिला परब, दीपा गावकर, सोमा सिनारी, पुष्पा शेटकर, विशाखा गावस, प्रगती नाईक, काजल  गावडे, देवता सावंत, दुर्गा तलवार, संतोष सावंत, विनिता गावकर असा एकूण ३० जणांचा गौरव करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सावंत यांनी केले, तर आभार सुरज नाईक यांनी मानले. कोविडची बंधने पाळून कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.

संबंधित बातम्या