
National Girl Child Day: सध्याच्या काळात मुलींचा आत्मविश्वास वाढणे खुप गरजेचे आहे. जर मुलींचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर याची सुरुवात घरापासून करायला हवी. त्यामुळे आज राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आम्ही काही टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे मुलींचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. मुलींवरील भेदभाव संपवणे, त्याविषयी जागरुकता पसरवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. यामुळे मलींचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
मुलींना प्रत्येक टप्प्यावर साथ द्या
पालकांचा पाठिंबा म्हणजे मुलांसाठी सर्व काही असते. तेसच मुलीसाठी (Girl) ते अधिक महत्वाचे आहे. ती जे काही करते त्यात तिला साथ द्या. तिला छोट्या छोट्या चुका करु द्या. तुमच्या मुलीला हे जाणवू द्या की काहीही झाले तरी तिचे आई- वडिल तिच्यासाठी प्रत्येक गोष्टीत सोबत आहेत.
मुलींना स्वता:वर प्रेम करायला शिकवा
मुली या आईच्या खुप जवळ्याच्या असाता. प्रत्येक गोष्टीत ती फक्त तिच्या आईकडे रोल मॉडेल म्हणून पाहते. म्हणून तुमच्या मुली किती सुंदर आहेत ते सांगा आणि त्यांना स्वतःवर प्रेम करायला शिकवा. तुम्ही सांगितलेल्या या सर्व गोष्टी त्यांच्या आगामी आयुष्यात (Life) त्यांच्या शरीराबद्दल आत्मविश्वास निर्माण करतील.
मुलीला टेक्नॉलॉजीची माहिती द्या
मुलींना सोशल मिडियाबाबत माहिती द्या. तुम्ही टिव्हीवर काय पाहता त्याबद्दल बोला. सोशल मीडिया (Social Media) चांगला का आहे आणि का नाही ते त्यांना सांगा. यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
पीपल प्लीजर बनवू नका
आपल्याकडे मुलींना दूसऱ्यांच्या आनंदासाठी अनेक गोष्टी करायला सांगितल्या जातात. कधी ती त्यांच्यानुसार कपडे परिधान करते तर कधी तिला आपले मत उघडपणे मांडता येत नाही. म्हणून, आपल्या मुलीला लहानपणापासूनच स्वतःचे निर्णय घेण्यास शिकवा. तिला विचारा 'तुला काय हवे आहे?' तिला निवड करू द्या आणि नंतर त्या निवडीचा आदर करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.