National Nutritious Week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका

पोषक तत्वांच्या (Nutrients) अभावामुळे कुपोषणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
National Nutritious Week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका
Natinal Nutritious week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका Dainik Gomantak

आजचे जग हे धावपळीचे झाले आहे. लोकांचे आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होत आहे. याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होत आहे. निरोगी आरोग्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे गरजेचे आहे. तसेच पोषक तत्वांच्या (Nutrients) अभावामुळे कुपोषणासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे या समस्याबद्दल जनजागृती (Awareness) करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा भारतात राष्ट्रीय पोषक सप्ताह (National Nutritious week) म्हणून साजरा केला जातो. जर आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर पुढील समस्यांना सामोरे जावे लागेल.

Dainik Gomantak

* केस गळणे

केस गळणे ही समस्या सामान्य झाली आहे. याचे कारण म्हणजे शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळतात. दिवसातून आपले 100 केस गळतात. तसेच पोषक घटकांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि चक्कर येणे यासरख्या समस्या निर्माण होऊ शकतात. नियमितपणे सकस आहार घेणे गरजेचे आहे. पालेभाज्या आणि फळे यांच्या आपल्या आहारात समावेश करावा. यामुळे केस गळणे कमी होईल.

Natinal Nutritious week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका
Healthy Tips: शरीरात रक्ताची कमतरता असले तर आहारात समाविष्ट करा हे पदार्थ

* वजन कमी होणे

निरोगी आरोग्यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. अन्यथा पोषक घटकांच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. शरीराच्या वाढीसाठी पूरक पोषक घटक न मिळाल्यास अचानक वजन कमी होते. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Dainik Gomantak

* रातांधळेपणा

अंधुक किंवा प्रकाशात कमी दिसणे म्हणजे रातांधळेपणा. ही समस्या शरीरातील व्हिटॅमिन अ च्या कमतरतेमुळे होऊ शकते. या समस्येमुळे डोळे कोरडे पडतात. व्हिटॅमिन अ हिरव्या पालेभज्या,पपई, लाल भोपळा, गाजर आणि माशाच्या यकृताचे तेल यासारख्या पदार्थांमध्ये असते. रातांधळेपणा असलेल्या लोकांनी आपल्या आहारात या पदार्थांचा समावेश करावा.

Dainik Gomantak

* हाडांमध्ये वेदना होणे

हाडे मजबूत राहण्यासाठी व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची गरज असते. जर तुमच्या शरीरात या दोन घटकांची कमतरता असेल तर तुम्हाला हाडाच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे सकस आहार घेणे आरोग्यासाठी लाभदायी ठरते.

Natinal Nutritious week 2021: सकस आहारकडे दुर्लक्ष करू नका
Health Tips: उपाशी राहिल्याने वाढतो शुगरचा धोका

* हृदयाचा धोका

हृदय विकरचा धोका शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते. तसेच ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे हृदया संबंधित अनेक आजार होऊ शकतात. यासाठी आपल्या आहारात पालेभाज्या, फळे, सुकामेवा यसारख्या पदार्थांचे सेवन करावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com