Navaratri Food: नवरात्रीच्या नऊ दिवसांत या रेसिपी नक्की ट्राय करा

नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही हे पदार्थ घरी नक्की करून पाहा
Navaratri Food: नवरात्रीच्या नऊ दिवसांत या रेसिपी नक्की ट्राय करा
Navaratri Food: नवरात्रीच्या नऊ दिवसांत या रेसिपी नक्की ट्राय करा Dainik Gomantak

नवरात्रीचे (Navaratri) नऊ दिवस देवीच्या विविध रुपांमधील पूजेला विशेष महत्व आहे. या दिवसांमध्ये भक्तगण नऊ दिवस देवीची पूजा करतात, कडक उपवास (fast) करतात या नऊ दिवसांत अनेक लोक एक वेळ फलाहार घेवून उपवास करतात. ज्या पदार्थांनामुळे आपल्याला ऊर्जा मिळते अशा पदार्थांचा समावेश करावा.चला तर मग जाणून घेवूया अशाच काही पदार्थाबद्दल (Food) जे तुम्ही सहज घरी बनवू शकता. नवरात्रीमध्ये (Navaratri) देवीच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये मांसाहार, लसूण, कांदा यांचे सेवन केले जात नाही.

* साबूदाणा वडा

उपवासात साबूदाणा वडा हा पदार्थ खूप आवडीने खाल्ला जातो. यात शेंगदाणे, मॅश केलेले बटाटे, धने पावडर आणि साबुडाण्याबरोबर वापरले जातात. नंतर याचे वडे तयार करून तेलात डिप फ्राय केले जातात.

* दही बटाटे

उपवासत साबुदाण्याबरोबर बटाट्याचाही सर्वाधिक वापर केला जातो. दही आणि आलू ही अशीच एक डिश आहे. जी उपवासात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. यात उकडलेले बटाटे दहिमध्ये टाकून बनवले जाते.

* साबूदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी ही उपवास दरम्यान बनवलेली सर्वात सामान्य डिश आहे. हा पदार्थ सर्वांच्या घरी उपवासला बनवला जातो. साबुदाणा खिचडी बनवणे खूप सोपे आहे. यात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. यात शेंगदाणे, साखर, काळी मिरी, आलू टाकून बनवली जाते .

Navaratri Food: नवरात्रीच्या नऊ दिवसांत या रेसिपी नक्की ट्राय करा
Shardiya Navratri Vrat 2021: नवरात्रीतल्या नऊदिवसाच्या उपवासांचे जाणून घ्या फायदे

* सिंघाडे पिठाचे समोसे

समोसाचे नाव एकल्यावर तोंडात पाणी येते. उपवासाच्या दिवशीची तुम्ही समोसाचा आनंद घेऊ शकता. समोसा तयार करण्यासाठी सिघाडे पीठ आणि बटाटा मसाला वापरुन तयार करता येईल.

*हलवा

उपवसा दरम्यान जर गोड पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही राजगिराच्या पिठापासून हलवा बनवू शकता. यात तुम्ही ड्रायफ्रुट्स सुद्धा मिक्स करू शकता.

* दही आणि चिप्स

बटाट्याचे चिप्स हे उपवासाच्या दिवसांत सर्वाधिक खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बटाटा चिप्स तळल्यानंतर त्यात थोडे मोठ, काळी मिरी टाकल्यास चव वाढते. पण त्यासोबत दही खाल्यास त्याची चव दुप्पट होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com