Navratri Festival 2021: तज्ञ डॉक्टरांकडून काळजी घेण्यासाठी खास टिप्स

आजपासून नवरात्री आणि दुर्गा पूजेच्या उत्सवांना सुरुवात होत आहे, यावर तज्ञ डॉक्टर म्हणतात की सण आहे; परंतु आपण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण करोना अजून गेला नाही. नियमांचे पालन करत आपण सण साजरे करू.
Navratri Festival 2021:Special Tips for Care from Expert Doctors
Navratri Festival 2021:Special Tips for Care from Expert DoctorsDainik Gomantak

श्रावण संपला तसं सणवार सुरू झाले, प्रत्येक घराघरात अगदी जय्यद तयारी केली जाते पण,करोना अजूनही संपला नाही हे आपल्याला विसरून चालणार नाही; गर्दी जमवून सण साजरे करण्याची गरज नाही, असं मत तज्ञ डॉक्टरांनी दिलं

Navratri Festival 2021:Special Tips for Care from Expert Doctors
Kitchen Tips: चॅापिंग बोर्ड खरेदी करतांना घ्यावी ही काळजी

सणासुदीच्या काळात लोकांना उत्साही वाटणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांना हे विसरून चालणार नाही की साथीचे रोग खूप चालू आहे. लोकांनी प्रत्येक वेळी मास्क घालणे आणि सामाजिक अंतर पाळणे हे आवश्यकच आहे.

आजपासून नवरात्री आणि दुर्गा पूजेच्या उत्सवांना सुरुवात होत आहे, यावर तज्ञ डॉक्टर म्हणतात की सण आहे; परंतु आपण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, कारण करोना अजून गेला नाही. नियमांचे पालन करत आपण सण साजरे करू.

कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी या नियमांचे पालन करा

* अतिथींसाठी आपला कार्यक्रम शक्य तितका सुरक्षित बनवावा; खोल्यांना हवेशीर ठेवा तसेच हवा खेळती ठेवा शक्यतो AC टाळा, खेळत्या वातावरणामध्ये टेरेस/बाल्कनीमध्ये कार्यक्रम आयोजित करा.

* कार्यक्रम थोडक्यात ठेवा; माणसं कमी असावीत

* लोकांना मास्क घालण्यास प्रोत्साहित करा आणि प्रत्येक अतिथीला इतरांपासून किमान 1 मीटर अंतर राखण्यासाठी पुरेशी जागा ठेवा.

* तुमच्या पाहुण्यांना मास्क, अल्कोहोल-आधारित हॅन्ड सॅनिटायझर याची योग्य व्यवस्था करा

* कार्यक्रमाची योजना करण्यापूर्वी स्थानिक सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

Navratri Festival 2021:Special Tips for Care from Expert Doctors
चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात सूर्यफूलाच्या बिया

कशी काळजी घ्याल

1. सर्व गर्दीची ठिकाणे टाळावीत; सण सर्व सावधगिरीने साजरे केले पाहिजेत.

2. खुल्या भागात लोकांना भेटा आणि नियोजित अंतर पाळा.

3. एकदा घराबाहेर पडल्यावर मास्क घालणे अत्यावश्यक आहे.

४. सहा फूट किंवा दोन मीटर सामाजिक अंतर अनिवार्य आहे.

5. आपले हात वारंवार स्वच्छ करा (किमान 20 सेकंदांसाठी).

6. सार्वजनिक ठिकाणी थुंकु नका

7. जरी तुम्ही गर्दीत असाल, तरी तुम्ही मास्क घाला आणि समोरासमोर संपर्क टाळा.

8. घरी परतल्यानंतर आपले कपडे डिटर्जंटने धुवा आणि गरम पाण्याने आंघोळ करा.

9. तज्ञांनी असे सुचवले आहे की ज्यांना श्वसनाच्या तक्रारी आहेत किंवा कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती आहे त्यांनी बाहेर जाण्यापासून परावृत्त केले पाहिजे.

10.काही लक्षणे दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com