अन्न प्रक्रिया क्षेत्रात नव्या संधी खुल्या

 New opportunities opened up in the field of food processing
New opportunities opened up in the field of food processing

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा एजन्सीच्या इन्व्हेस्ट इंडियाच्या विशेष गुंतवणूक मंचाच्या अन्न प्रक्रिया विभागाचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज उद्घाटन केले.  

इन्व्हेस्ट इंडियाने या फोरमची रचना जागतिक उद्योग क्षेत्रातले नेते आणि  केंद्र तसेच राज्य सरकार मधले उच्च स्तरावर  महत्वाचे निर्णय घेणारे  यांच्यात तपशीलवार चर्चा आयोजित करण्याच्या दृष्टीने केली आहे. यामधे केंद्र सरकार आणि आंध्रप्रदेश, आसाम, मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यातले वरिष्ठ धोरणकर्ते सहभागी झाले. 18 देशांमधल्या 180 कंपन्याही फोरम मधे सहभागी झाल्या.

कोविड-19 महामारीमुळे या क्षेत्राने अभूतपूर्व आव्हाने झेलली असून लॉकडाऊन यशस्वी राहावा याची सुनिश्चिती करण्यासाठी हे क्षेत्र  महत्वाची भूमिका बजावत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले. सध्या या क्षेत्राला देशांतर्गत मागणी मंदावल्यासह जागतिक व्यापारही खालावला असल्याशी संबंधित आव्हानासह आणखी काही आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

ही आव्हाने, या फोरमसारख्या  नव्या संधी  खुल्या करण्याकडे नेत असून या द्वारे 180 पेक्षा जास्त गुंतवणूकदार आणि 6 राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांना एकाच ठिकाणी एकाच वेळी आणणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या असंख्य संधी मंत्र्यांनी विषद केल्या. अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राने आर्थिक पाठबळ पुरवलेल्या अनेक प्रकल्पांना नवनव्या भू भागातून नुकत्याच नव्या ऑर्डर मिळत असल्याची माहिती  त्यांनी दिली. पौष्टिक अन्नावर लक्ष केंद्रित करतानाच, भारतीयांनी इतर देशांपेक्षा कोविडचे व्यवस्थापन उत्तम साधत असल्याचे लोक जाणतात. भारतातल्या पोषक घटकांनी युक्त आणि आरोग्याला हितकर असे  समृध्द  अन्न  पाश्चिमात्य देशांसमोर ठळकपणे मांडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. याशिवाय रेडी टू इट म्हणजेच खाण्यासाठी झटपट तयार होणाऱ्या अन्नाचा विभाग हा सहजसाध्य असून  जागतिक किरकोळ विक्रेते त्यांच्या दुकानात भारतीय अन्न ठेवू शकतात असे त्या म्हणाल्या.

देशांतर्गत  आणि विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि यासंदर्भात सहाय्य करण्यासाठी अधिकारप्राप्त सचिव गट आणि मंत्रालयामध्ये, खात्यांमध्ये प्रकल्प विकास विभाग स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. इन्व्हेस्ट इंडिया मधे अन्न प्रक्रिया उद्योगाचा समर्पित गुंतवणूक सुविधा विभाग निर्माण करण्यात आल्याची माहितीही त्यांनी या फोरम मधे सहभागी झालेल्यांना दिली. हा विभाग भारतात व्यापार करण्यासाठी  देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणुकदाराना मार्गदर्शन करणार आहे.

गो व्होकल फॉर लोकल अर्थात स्थानिक वस्तूंचा प्रचार करण्याच्या संकल्पनेला जोर पकडण्यासाठी मंत्रालय सर्व राज्यांना सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. देशातल्या विकासाच्या संधींचा लाभ घेण्यासाठी गुंतवणुकदाराना मदत व्हावी  यासाठी केंद्र आणि राज्य सरकार ठोस धोरणात्मक निर्णय घेत असल्याचे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com