डॉक्‍टरांकडून डॉक्‍टरांसाठी नवा संरक्षक

Pib
सोमवार, 18 मे 2020

कोविड-19 पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई परिधान करणे अतिशय महत्वाचे ठरते.पीपीई मुळे विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी होतो.

मुंबई, 

डॉक्टर,वैद्यकीय व्यावसायिक,आरोग्य कर्मचारी आणि आघाडीचे योद्धे कोविड-19 विरोधातल्या लढ्यात अविश्रांत योगदान देत आहेत. विविध कोरोना रुग्ण आणि कोरोना विषाणूने बाधीतांशी या व्यावसायीकांचा नित्याचा संबंध येतो.पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर केला नाही तर त्यांना स्वतःला या विषाणूची बाधा होण्याचा धोका असतो.

कोविड-19 पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई परिधान करणे अतिशय महत्वाचे ठरते.पीपीई मुळे विषाणूशी संपर्क होण्याचा धोका कमी होतो. मात्र अनेक थर असलेला पीपीई सूट किंवा पोशाख परिधान करून कोविड-19 च्या रुग्णावर उपचार करणे आणि उष्ण आणि दमट हवामानात 6,8 किंवा 12 तास काम करताना या व्यावसायिकांना होणाऱ्या त्रासाची कल्पना करणेही अशक्य आहे.

एक डॉक्टर, इतर डॉक्टरांचा त्रास समजून घेऊ शकतो,या डॉक्टरनी यावर व्यवहार्य आणि प्रभावी उपाय शोधला.भारतीय कल्पक वस्त्र साहित्यापासून तयार करण्यात आलेल्या नौदलाच्या NavRakshak नावरक्षक पीपीई मुळे वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिकात नवी आशा निर्माण झाली आहे.आरोग्य कर्मचाऱ्याच्या दृष्टीकोनातून हा पीपीई सूट तयार करण्यात आला आहे.

पीपीई तयार करताना प्रत्येकजण पाणी,रक्त,रुग्णाच्या शरीरातले द्राव यांना प्रतिकार करण्याची क्षमता असणाऱ्या साहित्याचा विचार करतो मात्र पीपीई वापरणाऱ्या व्यक्तीसाठी तो सुखकर किंवा त्याला हवेशीर कसा ठरेल यावर फारच कमी लक्ष पुरवले जाते.हा पीपीई सूट एका डॉक्टरने, डॉक्टरांचा हा त्रास विचारात घेऊन तयार केला असल्याचे शल्यविशारद लेफ्टनंट कमांडर अर्णब घोष यांनी सांगितले. मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेच्या नाविन्यता विभागाचे नौदल वैद्यकीय तज्ञ असलेले घोष हे या कमी खर्चाच्या पीपीईच्या संकल्पनेमागचे शिल्पकार आहेत.

नावरक्षक म्हणजे अद्भुत संरक्षक, याची दोन वैशिष्ट्ये आहेत, जास्तीत जास्त संरक्षण आणि जास्तीत जास्त हवेशीर.

एक डॉक्टर म्हणून मी सांगू इच्छितो की, भारतीय बाजारात उपलब्ध असलेले बरेच पीपीई हवेशीर या पैलूकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे घोष म्हणाले. कमी आणि दुय्यम दर्जाच्या पीपीईचा दीर्घकाळ वापर केल्याने आरोग्य कर्मचारी लगेच थकतो असेही त्यांनी सांगितले.

 

हवेशीर म्हणजे बाष्प जाऊ देण्याची आणि पाण्याला आत शिरण्यासाठी प्रतिबंध करण्याची त्या वस्त्राची क्षमता. वस्त्राची सुखकरता ही शरीरातले बाष्प बाहेर जाऊ देऊन शरीरावर द्रव जमा होऊ देण्यासाठी प्रतिबंध करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते.

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व मागणीमुळे, रुग्णालयांसाठी अनेक स्वयंसेवी संस्था आणि इतर संस्था पीपीई खरेदी करून त्याचा पुरवठाही करत आहेत.पुरवण्यात येत असलेल्या पीपीईचा दर्जा राखणे ही एक काळजीची बाब आहे. कमी दर्जाच्या पीपीई मुळे आरोग्य कर्मचाऱ्याचे आणखी नुकसान होऊ शकते कारण या पीपीई मुळे त्याला विषाणूपासून संरक्षण असल्याचा खोटा आभास होऊ शकतो.

नावरक्षक, न विणलेले अत्याधुनिक दर्जाचे कापड वापरून, विशिष्ट जीएसएम आणि विशिष्ट तंत्राने शिवलेले आहेत.यावस्त्राचे वैशिष्ट म्हणजे मजबूत एकसमान बांधणी जी,द्रव, रक्त, शरीरातले द्राव यांना उत्तम प्रतिरोध करते.

 

भारतीय नौदलाने विकसित केलेल्या या कल्पक आणि माफक खर्चाच्या पीपीई चे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या आयपीएफसीने पेटंट अर्थात स्वामित्व हक्क घेण्यासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे.

हा पीपीई तयार करण्यासाठी सात दिवस लागले.यासाठी कापडाच्या विस्तृत प्रकारांवर व्यापक संशोधन आणि ग्लोव तसेच यासारख्या इतर वैद्यकीय उपयोगाच्या साधनांचा अभ्यास करावा लागला.लॉक डाऊनमुळे कच्चा माल मिळवणेही कठीण होते.संशोधनानंतर मला हे नवे तंत्रज्ञान सापडले असे घोष म्हणाले.

मुंबईतल्या नौदलाच्या गोदीत या पीपीईची प्रायोगिक तत्वावर निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतल्या नौदल वैद्यकीय संस्थेचा नाविन्यता विभाग आणि मुंबईतली नौदल गोदी यांनी संयुक्तपणे याचे आरेखन आणि निर्मिती केली आहे.नव्या तंत्रज्ञानाची आयएनएमएएसने चाचणी घेतली आहे. पीपीईने 6/6 सिंथेटिक ब्लड पेनिट्रीएशन रेझीस्टन्स या रक्त आत शिरण्याला प्रतिबंध करण्या संदर्भातली चाचणी पार केली आहे. मोठ्या प्रमाणात निर्मितीसाठी आणि कोविड च्या सध्याच्या परिस्थितीत त्याचा वैद्यकीय वापर करण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. या उपक्रमात खरेदी आणि शिलाई यासारख्या कामात नौदल गोदी भागीदार आहे,असे घोष यांनी सांगितले

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानक अनुसरत आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मानकांना अनुसरून याची निर्मिती करण्यात आली आहे.

उष्ण आणि दमट वातावरणात दीर्घकाळ वापर करूनही हा पीपीई सुखकर ठरतो आणि तो किफायतशीर आहे.पीपीपी तयार केल्यानंतर तो परिधान करून मी स्वतः2-3 तास पंखे बंद करून, डॉक्टर या स्थितीत किती काळ सुखकर पणे वावरू शकतात याची त्याची चाचणी घेतली असे ते म्हणाले.

पीपीई च्या दर्जाबाबत तडजोड करायची असेल तर रेनकोट का वापरू नये असा सवाल त्यांनी केला.उत्तम दर्जाचे पीपीई उपलब्ध नसल्यामुळे अनेकजणांना दुय्यम दर्जाचे पीपीई वापरावे लागतात.

हा केवळ वैयक्तिक शोध नाही, भारतीय नौदलाने पीपीई आणल्यामुळे आता हे राष्ट्रीय उत्पादन ठरले आहे.आरोग्य विषयक हिरो अर्थात आदर्श ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन त्यांना सुखकर ठरणारा हा पीपीई सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताने संकटाच्या या काळात स्वयंपूर्ण होण्याची हाक दिली आहे त्याला अनुसरून याची निर्मिती करण्यात आली आहे.

या महामारीमुळे पीपीईच्या मागणीत अचानक मोठी वाढ झाली असल्याने या किफायतशीर पीपीई चे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.यासाठी पात्र कंपन्यांचा एनआरडीसी शोध घेत आहे. परवानाप्राप्त उत्पादनासाठी कंपन्या आणि स्टार्ट अपसाठी आपणcmdnrdc@nrdcindia.com.वर संपर्क करू शकतात.

संबंधित बातम्या