New Trend: Paithani चा असाही उपयोग

सोशल मिडियाच्या माध्यमातून सध्या पैठणीचा न्यू ट्रेंड आला असून, तो बाजारात धुमाकूळ घालत लाखोंची उलाढाल करत आहे.
New Trend: Paithani चा असाही उपयोग
PaithaniDainik Gomantak

हातमागाशी भारताची (India) नाळ जोडली आहे, हातमागाने (Handloom) अनेक मौल्यवान विणकाम जतन करून ठेवलेले आहेत. शतकांपासून महाराष्ट्रीयन नववधूंनच पहिल प्राधान्य पैठणीला जाते. पैठणी (Paithani) या महावस्त्राला अनेक वर्षांचा इतिहास (History) लाभला आहे. पैठणीने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Paithani
Covid Care Tips: कोविडपासून लवकर बरं होण्यासाठी खास आयुर्वेदिक टिप्स

पैठणी साडीचा इतिहास

औरंगाबादजवळच्या मध्ययुगीन पैठण शहराच्या राजघराण्यातील पैठणी साडीचा उगम झाला आहे. पैठणी साडया मूळतः चीनमधील उत्कृष्ट रेशीम धागे आणि स्थानिक झरीपासून बनवल्या गेल्या असे मानले जाते. अस्सल पैठणी साडी तयार करण्यासाठी, साधारण सहा यार्डसाठी सुमारे 500 ग्रॅम रेशीम धागे आणि आणखी 250 ग्रॅम झरी धागे वापरले जातात, तर नऊ-यार्डसाठी याशिवाय अधिक कच्चा माल वापरतात ज्याच वजन 900 ग्रॅम पर्यंत होते.

New Trend Of Paithani
New Trend Of PaithaniDainik Gomantak

पैठणी साडी

चमकदार विणकाम रंगांचा एक आनंददायक अंतर्भाव करते. पाठणीच्या पारंपारिक आकृतिबंधांमध्ये पोपट, मोर आणि कमळ यांचा समावेश होतो. तथापि, पेशवे काळात, हंस, अश्रफी आणि आसावल्ली तितकेच लोकप्रिय होते. पल्लूमध्ये सामान्यत: मुनिया, एक प्रकारचा पोपट असतो जो सीमेवर हिरव्या रंगात विणलेला असतो आणि तोंडावर लाल रंगाचा लहरी स्पर्श असतो. पल्लूमध्ये असलेल्या इतर काही डिझाईन्समध्ये पारंपारिक मोराचा समावेश होतो.

New Trend Of Paithani
New Trend Of PaithaniDainik Gomantak

कशी ओळखाल हातमागावरची पैठणी

पैठणीचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे साडीच्या दोन्ही बाजू अगदी सारख्याच दिसतात. यामुळे यंत्रमागवर बनवलेल्या पैठणी साड्यांच्या आणि बाजारातील इतर बनावट साड्या यांच्यातील फरक लगेच ओळखून येतो. लाल, पिवळ, आकाशी, किरमिजी, हिरवा आणि जांभळा, या पारंपरिक रंगांमध्ये पैठणी मर्यादित होती आता पैठणी कोणत्याही रंगात अगदी सहज मिळून जाते.

Paithani
National Nutrition Week: Diabetes साठी आहारात 'कार्बोहायड्रेट्स' आवश्यकच

पैठणीचा न्यू ट्रेंड

महावस्त्र म्हणून ओळख असणाऱ्या पारंपरिक पैठणीला आधुनिकतेची झलक देऊन तिच्यामध्ये नाविन्यता आणली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सध्या पैठणीचा न्यू ट्रेंड आला असून तो बाजारात धुमाकूळ घालत लाखोंची उलाढाल करत आहे. जाणून घेऊयात पैठणीचा न्यू ट्रेंड नेमका आहे तरी काय? पैठणी पासून स्त्रियांपासून ते अगदी पुरुषांपर्यंत ड्रेसचे सगळे प्रकार शिवले जातात इतकेच नाही तर अगदी मोजडी पासून ते तुमच्या पर्स पर्यंत पैठणीचा वापर केला जातोय.

  • कुर्ता : पैठणीच्या कापडापासून आजकाल कुर्ता शिवला जातो केवळ महिलाच नाही तर पुरूषांचे जॅकेट सुद्धा पैठणी पासून शिवले जातात लग्न समारंभात याची मागणी वाढली आहे.

  • दुपट्टा: महिलांसाठी कुर्ता वर घेण्यासाठी किंवा पंजाबी ड्रेस वर घेण्यासाठी खास पैठणी दुपट्टा तयार केला जातो.

  • शेला: नववधूसाठी खास पैठणी पासून शेला बनवला जातो .

  • मोजडी: नववधूसाठी किंवा वरसाठी हल्ली पैठणी पासून मोजडी देखील बनवतात.

  • गोधडी: जुन्या फाटलेल्या पैठणी पासून गोधड्या शिवल्या जातात ज्याचा वापर घरगुती कार्यक्रमासाठी करता येतो.

  • पर्स: जुन्या फाटलेल्या पैठणीच्या पदारपासून हल्ली पर्स शिवल्या जातात ज्या तुम्ही जरीच्या कोणत्याही साडीवर वापरू शकता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com