New Year: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर उपयुक्त

नवीन वर्षात जर तुम्हाला घरातील नकारत्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्या दूर करायच्या असेल तर कापूरचा वापर करावा.
New Year: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर उपयुक्त

New Year: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर उपयुक्त

Dainik Gomantak

घरात सुख- समृद्धी नांदावी असे प्रत्येकालाच वाटते. वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यात नवीन वर्षांत कोणते उपाय याची माहिती दिली आहे. वास्तुशास्त्रात कापूरला खूप महत्व आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे फायदे.

*घरात जर वस्तू दोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर आजपासूनच तुमच्या घरात देवाजवळ कापूर जाळायला सुरुवात करा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि नकारात्मकता दूर होते.

*स्वयंपाकघरातील सर्व कामे संपल्यानंतर, स्वयंपाकघरातील एका भांड्यात लवंग आणि कापूर जाळून टाका. यामुळे अन्नपूर्णा देवीची नेहमी कृपा घरावर राहते. तसेच आई प्रसन्न होते. घरात कधीच अन्नाची कमतरता जाणवत नाही. तसेच घरातील सदस्यांची प्रकृती चांगली राहते.

<div class="paragraphs"><p>New Year: घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कापूर उपयुक्त</p></div>
Vastu Tips: ख्रिसमसनिमित्त द्या 'या' खास भेटवस्तू

* घरात जर पितृदोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचा दोष असेल, तुमचे सर्व काम यशस्वी होत नसेल तर यावर उत्तम उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरावा. यामुळे घरातील पितृदोषाचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.

*घरात जर पैसाचे संकट असेल तर आजपासूनच नियमितपणे संध्याकाळी घराच्या अग्निकोनात म्हणजेच आग्नेय दिशेला कापूर पेटवा. त्यामुळे घरात धनसंपत्ती वाढते आणि सुख-समृद्धी टाकून राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com