Night Skin Care: चमकदार त्वचेसाठी रात्री चेहऱ्यावर दुधात चिमुटभर मिक्स करून लावा 'हा' पदार्थ

चमकदार त्वचेसाठी रात्री दुधात मध मिक्स करून लावावे.
Night Skin Care tips
Night Skin Care tipsDainik Gomantak

Night Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी महिला अनेक महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरतात. पण पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तुम्हाला घर कमी खर्चात चमतदार त्वता हवी असेल तर तुम्ही दुध आणि मधाचा वापर करू शकता. दुध आणि मदामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे चमकदार त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. रात्री झोपण्यापुर्वी हे मिश्रण लावल्यास कोणते फायदे होतात हे जाणून घेऊया.

साहित्य

दुध- १ चमचा

मध- १ चमचा

कसा वापर करावा

रात्री झोपण्यापूर्वी त्वचा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे आणि पुसून टाकावे. एका लहान भांड्यात 1 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचे मध चांगले मिक्स करावे. आता तयार मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या मसाज करावी. हे त्वचेसाठी खुप फायदेशीर ठरते. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर १५-२० मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. सर्वात शेवटी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावावे. यामुळे त्वचा ओलसर आणि मऊ राहील. 

Milk And Honey
Milk And HoneyDainik Gomantak
Night Skin Care tips
दुकानातील विकतचं तूप सोडा, 'या' भांड्याच्या मदतीने घरीच बनवता येईल शुद्ध तूप! सोपी आहे प्रोसेस

दुध आणि मध लावण्याचे फायदे कोणते?

दुध आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने मॉइश्चरायझ होण्यास मदत मिळते. तसेच त्वचा चमकदार होते.

दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.

मध आणि दुध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने मुरूमांची समस्या कमी होते.

तसेच दुध आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळतो.

यामुळे नियमितपणे दुध आणि मध रात्री चेहऱ्याला लावावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com