पृथ्वी तलावरील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती मडगावात

गोव्यातील चवडप्पा गुंजेकर याने आज साजरा केला 119वा वाढदिवस
पृथ्वी तलावरील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती मडगावात
गोव्यातील चवडप्पा गुंजेकर याने आज साजरा केला 119वा वाढदिवसDainik Gomantak

फातोर्डा: पृथ्वी तलावरील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती मडगावात आहे. दिकरपाली, रावणफोंड येथील चवडप्पा सी बी बी गुंजेकर याने आज आपला 119वा वाढदिवस साजरा केला व 120व्या वर्षात पदार्पण केले. जपान मधील केन तानाका हा 118 वर्षे व 318 दिवस अजुन जिवंत आहे. तर फ्रांस मधील जेन कालमेंत हा सर्वाधिक वर्षे म्हणजे 122 वर्षे 164 दिवस जगला. 1875 साली जन्मलेल्या जेनचे 1997 साली निधन झाले. आज 120व्या वर्षांत पदार्पण केलेला चव़डप्पा गुंजेकर हा मूळचा शाहपूर, बेळगाव पण 1924पासुन गोव्यात रावणफोंड मडगाव येथे स्थायिक झालेला जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती ठरलेला आहे. 

आपला जन्म 17 नोव्हेंबर 1902 साली शाहपूर, बेळगाव येथे झाला. वयाच्या 22व्या वर्षी मी गोव्यात आलो व रावणफोंडे येथे स्थायिक झालो व अजुनही येथेच आहे. सुरवातीला मी खडी फोडली. नंतर स्वताचे दोन क्रशर सुरु केले. माझ्याकडे चार ट्रक होते व नंतर एम्बासेडर गाडी पण घेतली. मी श्रीमंती पाहिली व सद्या अत्यंत हालाकिच्या परिस्थितीत जिवन जगत असल्याचे गुंजेकर यानी या प्रतिनिधिला सांगितले.

गोव्यातील चवडप्पा गुंजेकर याने आज साजरा केला 119वा वाढदिवस
Hearty Brunch: गोव्यातील ही 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

गुंजेकर याना आरोग्याची कोणतीही व्याधी नाही. माझे डोळे व बुद्धी अजुन शाबुत आहे. गेल्या दीड वर्षांपासुन मला लहान अक्षरे दिसत नाही. पण दिवसा तीन ते चार किमी चालतो. दिवसा एक जेवण व व्यवस्थित आहार घेतो. माझ्या सदृढ आरोग्याचे गुपित असे काहीच नाही. केवळ देवाचे आशिर्वाद आपल्यावर आहेत असेच मी मानतो असेही गुंजेकर यानी सांगितले. मी पोर्तुगाली राजवट पाहिली व पोर्तुगीजाचे सरकार बांधकामासाठी आपल्याकडुनच खडी घेत असे. स्वातंत्र्या नंतरचेही दिवस मी पहात आहे. मात्र आता मी समाधानी आहे. लोकाच्या मदतीने व त्यांच्या आशिर्वादाने जिवन जगतो आहे. मात्र कुणाकडेही हात

गोव्यातील चवडप्पा गुंजेकर याने आज साजरा केला 119वा वाढदिवस
भाजप नेते विश्वजीत कृष्णराव राणे यांचा आपमध्ये प्रवेश

लोकाच्या मदतीने व त्यांच्या आशिर्वादाने जिवन जगतो आहे. मात्र कुणाकडेही हात पसरले नाहीत हे मी अभिमानाने सांगु शकतो असेही गुंजेकर यानी सांगितले. स्वातंत्र्यानंतर मी एकदाही मतदान चुकवलेले नाही. मी प्रत्येक निवडणुकीत मतदान केले असल्याचे गुंजेकर यानी सांगितले. आपल्याला सरकारी पेन्शन येत नसल्याचे त्यानी सांगितले.  वेळ्ळीचे सरपंच सावियो डिसिल्वा हे या वेळी उपस्थित होते. त्यानी सांगितले की या वयोवृद्ध व्यक्तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकोर्ड तसेच लिमका बुक ऑफ रिकोर्डमध्ये नोंद झाली पाहिजे. गुंजेकर सारखा जगातील वयोवृद्ध व्यक्ती गोव्यात व भारतात आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.  राज्य सरकारा बरोबरच केंद्र सरकारनेही त्याची नोंद घेऊन त्यांचा योयग्य सन्मान करणे उचित ठरेल. त्याची जागतिक स्तरावर नोंद होणे गरजेचे आहे असेही त्याने सांगितले. त्याच्या पॅन व निवडणुक कार्डवर 1902 हे जन्मवर्ष म्हणुन नोंद आहे. त्याला सरकारी पेन्शन सारख्या इतर सरकारी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीन असे डिसिल्वा यानी सांगितले. 

या प्रसंगी वेळ्ळी युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षा केनिशिया मिनेझीस. शेजारी ब्रिटो फर्नांडिस व गुंजेकर यांचे कुटुंबिय उपस्थित होते. त्याचे श्यामसुंदर, नारायण या पुत्रांचे निधन झाले असुन विष्णु, श्रवण, विश्र्वास, चिंतू हे चार पुत्र हयात आहेत. गुंजेकर यांच्या पत्नी नागुबाई यांचे निधन 1993 साली झाले होते. मी चवडप्पा गुंजेकर यानी अगदी लहानपणापासुन ओळखतो. त्याच्या वयाची दखल कुटुंंबियानी घेतली नाही. पण जेव्हा त्याचे वय माझ्या लक्षात आले तेव्हा ही बाब मी सावियो याना सांगितली. एवढे वयोवृद्ध असुनही त्याना चष्मा लागत नाही, ते सर्वांना ओळखतात. त्याना वाचता येते अशी माहिती ब्रिटो फर्नांडिस यानी दिली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com