Online Chatting वर चुकूनही 'या' 5 गोष्टी करू नका, नाहीतर नात्यात येईल दुरावा

ऑनलाइन चॅटिंगच्या वेळी अनेक वेळा तुम्ही हे स्पष्टीकरण लोकांना दिले असेल की 'मला असे म्हणायचे नव्हते'.
Online Chatting
Online Chatting Dainik Gomantak

सोशल मिडियामुळे दुर असलेल्या व्यक्तीशी संवाद साधने सोपे झाले आहे. याद्वारे आपण आपले शब्द आणि विचार इतरांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. जरी प्रत्येक गोष्टीचे काही फायदे आहेत आणि काही तोटे देखील आहेत.

ऑनलाइन चॅटिंगमुळे (Online Chatting) चोवीस तास अनेक लोकांशी कनेक्ट राहणे सुलभ झाले असेल, परंतु आजही ते समोरासमोरील संवादाशी स्पर्धा करू शकलेले नाही. मॅसेजमुळे अनेक वेळा मन दुखावले जातात.

तुम्ही देखील ऑनलाईन चॅट करतांना असे म्हटले असेल की 'मला असे काही बोलायचे नव्हते'. हे असे घडते जेव्हा आपले विचार किंवा शब्द ते ज्या पद्धतीने बोलले जातात त्याप्रमाणे इतरांपर्यंत पोहोचत नाहीत.

त्यामुळे अनेकवेळा नातेसंबंध बिघडण्याची परिस्थिती निर्माण होते. समोरासमोर संवाद करताना अनेक गोष्टी सांगण्यासाठी खूप धैर्य लागते, तर ऑनलाइन चॅटिंगमध्ये अनेक वेळा मर्यादा ओलांडली जाते. यामुळेच कूनही ऑनलाइन चॅटिंग करतांना या गोष्टी टाळाव्या.

  • सॉरी बालणे

जर तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी एखाद्याला सॉरी बोलायचे असेल तर नेहमी समोरासमोर बोलावे. कारण अनेकदा असे दिसून येते की मॅसेजवर सॉरी बोलल्यावर समोरची व्यक्ती असभ्य वागणूक दाखवते किंवा तुमच्या मॅसेजकडे दुर्लक्ष करते. त्याला तुमच्या भावना नीट समजत नाहीत, कारण तो तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहू शकत नाही.

  • अपमान

जेव्हा लोक एखाद्या गोष्टीबद्दल रागवतात किंवा नाराज असतात, तेव्हा ते अनेकदा मॅसेज करुन तुमच्यावर राग व्यक्त करू शकतात किंवा दुखावणाऱ्या गोष्टी बोलू शकतात. पण समोरासमोर संवाद करताना समोरच्या व्यक्तीकडे पाहून परिस्थितीचा अंदाज लावणे सोपे जाते. समोरची व्यक्ती दु:खी आहे किंवा तुटलेली आहे हे आपण समजतो, म्हणूनच तो असे वागतो. पण अनेकदा मॅसेजमधून कोणी असभ्य असण्याचे कारण अनेक वेळा समजत नाही.   

Online Chatting
Vastu Tips For Office: ऑफिसमध्ये काम करताना 'या' 5 गोष्टी ठेवा लक्षात
  • सीक्रेट

समोरासमोर संवाद करताना एक रहस्य नेहमी उघडले पाहिजे. कारण अनेक गोष्टी डिलीट होईपर्यंत मजकुरात सेव्ह राहतात. अशा स्थितीत तुमचं एखादं रहस्य कुणाच्या चॅट लिस्टमध्ये असेल तर ते कुणी वाचणार नाही ना अशी भीती कायमच असते.

  •  फ्रस्ट्रेशन

फ्रस्ट्रेशन दूर करण्यासाठी मॅसेज कधीही करु नका. कारण समोरची व्यक्ती तुमचा गैरसमज करून घेऊ शकते. तो तुमच्याबद्दल असे विचार निर्माण करू शकतो, ज्याचा तुमच्याशी अजिबात संबंध नाही. 

  • आर्ग्युमेंट

कोणत्याही गोष्टीवर आर्ग्युमेंट करण्यासाठी मॅसेज हा एक चांगला पर्याय असल्याचे सिद्ध होत नाही. कारण दोघेही आपापली गोष्ट बोलतात आणि एकमेकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. समोरासमोर संवाद करताना, तुम्हाला एकमेकांचा दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com