Ganpati Bappaसाठी पंचखाद्य मोदक

'ख' पासून सुरू होणारे पंचखाद्य
Ganpati Bappaसाठी पंचखाद्य मोदक
Ganpati Bappaaसाठी पंचखाद्य मोदक Dainik Gomantak

मोदक (Modak) आणि गणरायाचे (Ganpati) अनोखे नाते आहे. गणेशोत्सवानिमित्त प्रत्येक घरात मोदक तयार केले जातात. गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहे. या दहा दिवसांत घरोघरी बाप्पांसाठी दररोज विविध प्रकारचे मोदक (Modak) प्रसाद म्हणून तयार केले जातात. आज जाणून घेवूया 'ख' पासून सुरू होणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले मोदक .

Modak
ModakDainik Goantak

साहित्य:

खारीक 2 वाटी

खोबऱ्याचा कीस - पाऊण वाटी

खजूर - 10 ते 12

खसखस- 3 चमचे

खडीसाखर - 10 ते 15 खडे

Ganpati Bappaaसाठी पंचखाद्य मोदक
या गणेश चतुर्थीला नक्की करा हे ' Special Modak '

कृती:

सर्वात प्रथम खारीक मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. नंतर खोबऱ्याचा कीस, खारीक पावडर आणि खसखस एका कढईत भाजून घ्यावे. नंतर खडीसाखर आणि खजूरमधील बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. आता सर्व पदार्थ एकत्र मिक्सरमध्ये चांगले बारीक करून घ्यावे. नंतर हे मिश्रण हाताने चांगल्याप्रकारे एकजीव करून घ्यावे. नंतर मोदकाच्या साच्याला तूप लावून हे मिश्रण भरावे. तयार आहेत स्वादिष्ट मोदक.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com