Paneer fingers Recipe: घरीच घ्या कुरकुरित 'पनीर फिंगर्स' चा आस्वाद

Evening Snack: पनीर फिंगर्स नाश्त्यात किंवा स्नॅक म्हणून बनवले जातात
Paneer fingers Recipe
Paneer fingers RecipeDainik Gomantak

सध्या हिवाळ्याचा हंगाम आहे आणि यावेळी काही चवदार पाककृती न्याहारीमध्येही बनवता येतात. प्रत्येक वेळी पनीरची भाजी खाणे आवश्यक नाही. त्याऐवजी तुम्ही पनीर फिंगर्स बनवू शकता जी एक उत्तम खाद्यपदार्थ मानली जाते. तुम्हाला ते स्वादिष्ट वाटेल तसेच हे प्रोटीनयुक्त अन्न आहे जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. मुलंही पनीर फिंगर्स मोठ्या आवडीने खातात. जर तुम्ही पनीर फिंगर्स (Paneer fingers Recipe) स्नॅक्स म्हणून बनवले नसेल किंवा नाश्ता म्हणून खाल्ले नसेल तर या थंडीत नक्की बनवा. त्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि ती कमी वेळात बनवता येते.

  • पनीर फिंगर्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • पनीर - 250 ग्रॅम

  • काळी मिरी पावडर - 1 टीस्पून

  • चाट मसाला – 1/4 टी स्पून

  • ब्रेच पावडर - 1/2 कप

  • हळद - 3/4 टीस्पून

  • मैदा - 1/2 कप

  • तेल - तळण्यासाठी

  • मीठ - चवीनुसार

  • कॉर्न स्टार्च – 1 टेबलस्पून

  • लाल तिखट - 1 टीस्पून

Paneer fingers Recipe
Ignorance in Relationship : तुमचाही पार्टनर करतोय 'इग्नोर'? मग ही असू शकतात कारणे
  • पनीर फिंगर्स कसे बनवायची पध्दत

  • पनीरची फिंगर्स बनवण्यासाठी पनीर घ्या आणि फिंगर्सच्या आकारात कापून घ्या. 

  • नंतर एका मोठ्या भांड्यात पनीरचे तुकडे टाका, त्यात काळी मिरी पावडर, लाल तिखट, चाट मसाला आणि थोडे मीठ घालून चांगले मिक्स करा. 

  • आता पनीरला 10 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी सोडा. 

  • मैदा आणि कॉर्न स्टार्च दुसऱ्या भांड्यात ठेवा. त्यात थोडे मीठ आणि पाणी घालून पीठ तयार करा. 

  • कढईत तेल टाकून मंद आचेवर गरम होऊ द्या. 

  • पनीरचे तुकडे मैद्याच्या पिठात बुडवून नंतर ब्रेड क्रंबमध्ये टाकून चांगले गुंडाळून तळून घ्या. 

  • पनीरची फिंगर गरम तेलात तळून घ्या. 

  • ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळत राहा. 

  • त्याचप्रमाणे सर्व पनीर फिंगर तळून घ्या. 

  • संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करु शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com