Parenting Tips : तुमच्या मुलांनाही आहे सतत फोन वापरण्याची सवय? मग वेळीच करा 'या' गोष्टी

Children's Excessive Mobile Use : आजकाल लहान मुलांच्या हातातही स्मार्टफोन दिसू लागले आहेत.
Children's Excessive Mobile Use
Children's Excessive Mobile UseDainik Gomantak

Parenting Tips : आजकाल लहान मुलांच्या हातातही स्मार्टफोन दिसू लागले आहेत. लहान मुलांना मोबाईलचे वैशिष्टय़ इतके चांगले माहीत असते की आपणही पराभूत होऊ शकतो. फोनमध्ये यूट्यूब आणि गेम्स कुठे आहेत, ते कसे वापरायचे, हे सर्व मुलं काही मिनिटांत शिकतात.

याशिवाय टीव्ही न पाहता जेवण न करण्याची सवय जवळपास प्रत्येक मुलामध्ये दिसून येते. मात्र, टीव्ही पाहण्याच्या ओघात ते नीट खात-पित नाहीत. दुसरीकडे चुकून जर त्यांचे आवडते कार्टून चॅनल बदलले तर मुलांचे रडणे ही घरोघरी गोष्ट बनली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालकांना मुलांवर सतत लक्ष ठेवता येत नाही, म्हणून ते मोबाईल हातात देतात किंवा टीव्ही चालू करतात. (Children's Excessive Mobile Use)

Children's Excessive Mobile Use
Relationship Tips : बायकोला नवऱ्याच्या 'या' गोष्टी कधीच आवडत नाहीत; वेळीच सवयी सुधारा

मुलं टीव्ही आणि मोबाईलमध्ये व्यस्त होऊ शकतात पण मोबाईल आणि टीव्हीचा अधिक वापर केल्याने ते त्याचे व्यसनी होतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या मुलालाही टीव्ही आणि मोबाईल फोनची सवय लागली असेल तर काही पद्धतींचा अवलंब करून पालक मुलांच्या या सवयी सोडवू शकतात.

मुलांमधील मोबाईल-टीव्हीच्या सवयीवर मात करण्यासाठी टिप्स

  • मुलांना वेळ द्या

मोकळा वेळ घालवण्यासाठी मुलं मोबाईल आणि टीव्ही बघायला लागतात आणि जास्त वेळ घालवल्यामुळे त्यांना व्यसन जडतं. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे. जेव्हा मूल पालकांसोबत व्यस्त असते, तेव्हा ते टीव्ही किंवा मोबाईलपासून दूर जाऊ लागतात. यामुळे त्यांच्या मेंदूचाही चांगला विकास होईल.

  • तुमच्या मुलाला नवीन गोष्टी शिकवा

मुलाला टीव्ही किंवा मोबाईलच्या वापरापासून दूर ठेवण्यासाठी त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी प्रवृत्त करा. त्यांचा छंद किंवा आवड समजून घ्या आणि त्याकडे प्रोत्साहन द्या. गाणे, नृत्य, चित्रकला किंवा धार्मिक कार्यात मुलांना सहभागी करून घ्या. मुलांचा वेळ अशा कामांमध्ये जातो तेव्हा मोकळ्या वेळेत टीव्ही आणि मोबाईल वापरण्याऐवजी ते त्यांच्या आवडीच्या कामांना वेळ देतात.

  • वेळ सेट करा

मुलांना टीव्ही किंवा मोबाईलचे खूप व्यसन असेल तर ते दूर करण्यासाठी, टीव्ही पाहण्याची किंवा मोबाईल वापरण्याची वेळ निश्चित करा. अशाने त्यांचा वेळ हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडून एका झटक्यात मोबाईल काढून घेतल्याने सवय सुटणार नाही.

  • स्वतःला बदला

पालकांच्या वागण्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो. जर पालक मुलांसमोर मोबाईल किंवा टीव्हीमध्ये जास्त वेळ घालवत असतील तर मूलही तेच करेल. त्यामुळे मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com