Promise Day 2021: या 5 प्रॉमीसवर उभी करा आपल्या नात्याची इमारत

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

आपल्या खास व्यक्तीला प्रॉमीस करून आपला हा आजचा दिवस साजरा करू शकता. पण हे लक्षात असू द्या की, तूम्ही जे प्रॉमीस आयुष्यभर पूर्ण करू शकाल तेच प्रॉमीस आपल्या पार्टनरला करा. खोटे आश्वासन देवून स्वत:ला आणि आपल्या पार्टनरला फसवू नका.

Valentine Week 2021:  व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. आतापर्यंत आपण फूलं दिली, चॉकलेट्स दिली. आपलं प्रेम, आपल्या भावना व्यक्त केल्या आता वेळ आली आहे ती आपले प्रेम सिद्ध करण्याची आणि आपल्या पार्टनर चा विश्वास प्राप्त करण्याची. व्हॅलेंटाईन विकचा आज पाचवा दिवस म्हणजे प्रॉमिस डे 2021. 

कोणतेही नाते म्हटले की, त्यात विश्वास, वचन,  कमेकांना दिलेली कनिटमेंट खूप जास्त महत्वाची असते. विश्वासाने केलेलं प्रॉमीस कोणतेही नातं मजबूत करते. आजच्या दिवशी प्रेम करणारे कपल एकमेकांना कधीही सोडणार नाही, कधीही एकमेकांना दु: ख देणार नाही असे वचन देतात. मी तुला जपणार काळजी घेणार असेही वचन देतात. पण परिस्थितीनुसार आणि वेळेनुसार या वचनांचा विसर पडत जातो. 

आज 11 फेब्रुवारी 2021 रोजी प्रॉमिस डे साजरा केला जात आहे. एखाद्यावर आयुष्यभर प्रेम करणे ही खूप मोठी तपश्चर्या आहे. संपूर्ण आयुष्याभर तीला किंवा त्याला विश्वासाने जपण्याचे प्रॉमीस आत्मविश्वासाने केले जाते हेही तेवढेच खरे आहे. आपणही आज आपल्या खास व्यक्तीला प्रॉमीस करून आपला हा आजचा दिवस साजरा करू शकता. पण हे लक्षात असू द्या की, तूम्ही जे प्रॉमीस आयुष्यभर पूर्ण करू शकाल तेच प्रॉमीस आपल्या पार्टनरला करा. खोटे आश्वासन देवून स्वत:ला आणि आपल्या पार्टनरला फसवू नका. आपण जे मनापासून पूर्ण करू शकतो तेच प्रॉमीस  एकमेकांना द्या.

प्रॉमिस डेची वाट सगळेच बघत असतात. तेव्हा आम्ही तुम्हाला कल्पना देवू की, प्रोमिस डे ला आपण सहजपणे कोणते प्रॉमीस पूर्ण करू शकाल कोणते असे वचन आपण आपल्या पार्टनरला दिले पाहिजे. ज्यामुळे तुमचे नाते आणखी समृद्ध होईल. चला तर जाणून घेवूया...

पार्टनरला महत्त्व द्या- जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारास प्रत्येक गोष्टीत महत्त्व देता, तेव्हा तुमचे नाते आणखी दृढ होते. परंतु बरेच लोक असे करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या नात्यात अंतर पडत जाते. अशा परिस्थितीत, या प्रॉमीस डे ला आपण आपल्या जोडीदारास त्यांना महत्त्व देण्याचे त्यांचा आदर करण्याचे प्रॉमीस करू शकता.

पार्टनरसोबत खोटे बोलू नका - खोटं बोलण्याने कोणतेही नाते कमकुवत होत जाते. नात्यातला विश्वास उडत जातो. काही योग्य कारणास्तव खोटे बोलले गेले असेल ठीक आहे, परंतु तुम्ही मुद्दाम खोटे बोलत असाल तर तुमच्या जोडीदाराचा विश्वास यामुळे कमी होतो. अशा परिस्थितीत आपले संबंध नेहमीच चांगले आणि मजबूत ठेवण्यासाठी आपण एकमेकांना वचन दिले पाहिजे की आपण कधीही एकमेकांसोबत खोटे बोलणार नाही.

पार्टनरसोबत भांडण करू नका - प्रत्येक नात्यात छोटे मोठे भांडणं होतातच, अशा परिस्थितीत आपण आपल्या नात्यावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देवू नका. जर आपले नाते वाचवायचे असेल तर आपण अशा लहान सहान मुद्दयांवरून भांडण करणे कमी करा आणि भांडणं झालीच तर त्याकडे दुर्लक्ष करा. एकमेकांशी बोलून त्या भांडणाचे मुळ शोधून काढा. आणि बसून बोलून तुमच्यातील वादाचे संवादात रूपांतर करा. छोट्या छोट्या गोष्टींवर राग न ठेवण्याचे वचन तुम्ही आपल्या पार्टनरला देऊ शकता.

आपल्या पार्टनरला वेळ द्या - हल्ली या धावपळीच्या जीवनात प्रत्येकचजण कशाच्यातरी मागे पळतांना आपल्याला दिसत आहे. कुणी पैशाच्या मागे, कुणी नोकरीच्या मागे, कुणी व्यसनाच्या मागे तर कुणी ट्रेनच्या मागे असा प्रत्येतजण धावतच आहे. अशात आपल्या पार्टनरकडे आपलं दुर्लक्ष होत जाते. आणि काहीही न करता नात्यात  अंतर पडत जाते. तेव्हा दिसातल्या 24 तासांपैकी हक्काचे 2 तास तरी आपल्या पार्टनर ला द्या एकमेकांसाठी वेळ काढा एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करा आपल्या सुख दु:खाची देवाणघेवाण करा. तर आजच्या दिवशी आपण आपल्या पार्टनरला त्याच्या हक्काची वेळ देण्याचे प्रॉमीस करू शकता.

पार्टनरसोबत प्रामाणिक रहा – कोणतही नात हे विश्वासावर आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. नात्याचा पायाच प्रामाणिकपणा आहे. या प्रामाणीकपणावरच नात्याची इमारत उभी असते. एकमेकांचा विश्वासघात न करणे. समजुतदारपणे आपल्या पार्टनरशी संवाद साधणे आजच्या काळातील नात्याची गरज आहे. तेव्हा आजच्या दिवशी आपल्या जोडीदारास एकमेकांसोबत नेहमी निष्ठावान राहण्याचे वचन तुम्ही आपल्या पार्टनरला देवू शकता.

संबंधित बातम्या