Winter Health Tips: हिवाळ्यात 'या' तीन अवयवांची घ्या विशेष काळजी, अन्यथा होतील अनेक समस्या

हिवाळ्यात संपूर्ण शरीर महत्वाचे असतेच पण, शरीराच्या तीन भागांचे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
Winter Health Tips
Winter Health TipsDainik Gomantak

Winter Health Tips: हिवाळ्याला आता खऱ्या अर्थानं सुरूवात झाली आहे. वाढती थंडीमुळे त्वचे संबधित अनेक समस्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. डॉक्टर देखील हिवाळ्याच्या काळात शरीराची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात संपूर्ण शरीर महत्वाचे असतेच पण, शरीराच्या तीन भागांचे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कारण यावर परिणाम झाल्यास संपूर्ण आरोग्य बिघडू शकते.

Winter Health Tips
Aurangabad News: स्वत:ला पेटवून प्रेयसीला मारली मिठी, मराठवाडा विद्यापीठ परिसरातील धक्कादायक घटना

थंडीत चयापचय आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होतात. यामुळे संसर्ग देखील लवकर पसरतो. हिवाळ्यात सर्दी, फ्लू, खोकला, न्यूमोनिया, घसा खवखवणे, दमा, श्वास घेण्यात अडचण, खराब रक्ताभिसरण अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

डोके महत्वाचा अवयव

डोके हा आपल्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आयुर्वेदात देखील याला खूप महत्त्व देण्यात आले आहे. डोके मेंदूसह इतर संवेदनशील अवयवांसाठी देखील महत्वाचे कार्य करत असते. म्हणूनच थंडीत डोक्यात टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

Winter Health Tips
Zakir Naik In FIFA: भारताचा वादग्रस्त इस्लाम धर्मगुरू 'फिफा'मध्ये, 'या' कामासाठी विशेष आमंत्रण

कान

कान आपल्याला ऐकू येण्यासह आणि शरीराचे संतुलन राखण्यास मदत करतो. आयुर्वेदानुसार हा वात अवयव आहे. थंड वाऱ्यापासून कानांचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ किंवा टोपीने कान झाकावे.

तळपयांचे थंडीपासून संरक्षण

तळपयांचे थंडीपासून संरक्षण करणे आवश्यक असते. तळव्यांचा थंडीपासून बचाव न केल्यास विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तळवे उबदार ठेवल्याने शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहते आणि बाकीचे अवयवही निरोगी राहण्यास मदत होते. म्हणूनच थंडीत उबदार मोजे आणि शूज वापरण्याचा सल्ला दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com