कोरोना रोगाच्या धोक्याविषयी माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रकाशन

 Publication of a booklet on the dangers of corona disease by the Department of Science and Technology
Publication of a booklet on the dangers of corona disease by the Department of Science and Technology

नवी दिल्ली, 

राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संपर्क परिषद (एनसीएसटीसी) आणि केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) यांनी अलिकडेच आरोग्य आणि कोरोना रोगाच्या धोक्याविषयी माहिती देणारी 'इयर ऑफ अवेअरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (YASH) विथ फोकस ऑन कोविड-19’, कोविड-19 वर लक्ष केंद्रित करताना विज्ञान आणि आरोग्य याविषयी जाणीव जागृती करणारे वर्ष` पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. माहिती पुस्तिकेमध्ये विशेषः कोविड-19 साथीमुळे उद्‌भवलेल्या जोखमी, संकटे, आपत्ती आणि अनिश्चिततेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी देशातील अशा प्रकारच्या मोठ्या कार्यक्रमाची उत्पत्ती आणि त्यांची आवश्यकता याबात माहिती देण्यात आली आहे. सध्याच्या आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने चांगल्या तयारीसाठी विज्ञान आणि आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांची समज वाढवण्यावर हा कार्यक्रम केंद्रित आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत जनजागृती निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे आणि समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजीटल, लोकवाङ्मय आणि परस्परसंवादी माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पुढे ते म्हणाले की,  माहिती पुस्तिकेवर देण्यात आलेले यश (YASH) कार्यक्रमाचे बोधचिन्ह हे शांतता आणि परमानंदाची लहर निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे आणि मोठ्या प्रमाणात परिस्थितीवर मात करण्याची भावना त्यातून दर्शविली जात आहे आणि विज्ञान, आरोग्य, जोखीम आणि जागरुकता संदेश यांना अग्रस्थानी घेण्याची योजना आहे.

तळागाळापर्यंत आकर्षक आणि मनोरंजक पद्धतीने अधिकृत माहिती पोहोचविण्याच्या उद्देशाने, कोविड-19 वर लक्ष केंद्रित करणारा आरोग्य आणि रोगाच्या धोक्याची माहिती देणारा सर्वसमावेशक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य आणि रोगाच्या धोक्याची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे आणि भारतात सर्वदूरपर्यंत हा कार्यक्रम पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचा यामध्ये सहभाग आहे. सॉफ्टवेअर, सामग्री विकास, क्षमता निर्माण आणि प्रसार आणि पोहोच हे या कार्यक्रमातील तीन महत्वाचे घटक आहेत.

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य आणि ईशान्येकडील सहा प्रदेशांपेक्षाही अधिक ठिकाणी हा उपक्रम पोहोचला आहे. विशेषत्वाने चिन्हांकित प्रदेशांनुसार विशेष संपर्क साधने विकसित करण्यात आली आहेत, संपर्कजाळे आणि संवादकांना प्रशिक्षण आणि स्वयंसेवकांना सामाजिक आरोग्याच्या संबंधित क्रियाकलापांचे प्रशिक्षण देणे फायद्याचे ठरेल. कोविड-19 च्या आजारामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराच्या परिस्थितीत चिंता निर्माण झाली आहे आणि शास्त्रीय जनजागृती निर्माण करण्याचे आव्हान चोहोबाजूला आहे आणि या साथीच्या आजाराच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्याची तयारी ही महत्त्वापूर्ण भूमिका बजावू शकते आणि अधिकृत शास्त्रीय माहितीचा वापर आणि यामध्ये समाविष्ट असलेले संभाव्य धोक्यांची एकमेकांना जाणीव करून देणे आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी समुदायाला सुलभ मार्ग देणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com