गर्भवती महिलांसाठी भोपळ्याच्या बिया ठरु शकतात धोकादायक!

भोपळ्याच्या बियांचे अतिसेवण आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
गर्भवती महिलांसाठी भोपळ्याच्या बिया ठरु शकतात धोकादायक!
Pumpkin seeds can be dangerous for pregnant women! Dainik Gomantak

भोपळा (Pumpkin) हा एक भाजीचा प्रकार आहे. यात अनेक पोषक घटक (Nutrients) असतात. याचा वापर अनेक पद्धतीने करू शकतो. अनेक लोक भोपळ्यामधील बिया (Pumpkin seeds) फेकून देतात. बियांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, ई, लोह, कॅल्शियम, नियासिन, जस्त यासारखे पोषक घटक असतात. यातील व्हिटॅमिन ई त्वचा (Skin) आणि केसांसाठी (Hair) खूप फायदेशीर असतात. पण अनेक लोकांनी भोपळ्याच्या बियाचे (Pumpkin seeds) सेवन केल्यास आरोग्यास (Health) धोका निर्माण होऊ शकतो. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या लोकांनी भोपळ्याच्या बियाचे सेवन करणे टाळावे.

गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी धोकादायक

गर्भावती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी भोपळ्याच्या बियाचे कमी प्रमाणात सेवन करावे. आरोग्य तज्ञांच्या मते गर्भवती महिलांनी भोपळ्याच्या बियाचे अधिक प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास धोकादायक ठरू शकते.

* मधुमेहाचे रुग्ण

अनेक संशोधनामध्ये असे सांगण्यात आले की भोपळ्याच्या बिया मधुमेह रुग्णासाठी फायदेशीर असते.कारण रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. पण जर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असेल तर आरोग्य तज्ञांचा सल्ला घेवून याचे सेवन करावे.

Pumpkin seeds can be dangerous for pregnant women!
Health Tips: नितळ त्वचेसाठी करा या पदार्थांचा समावेश

* कमी रक्तदाब असणाऱ्यानी सेवन टाळावे

भोपल्याच्या बियांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे रक्तदाब पातळी कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल तर आरोग्य तज्ञांचा सल्ला घेवूण भोपल्याच्या बियांचे सेवन करावे.

* पोतसंबंधीत समस्या

भोपल्यामध्ये भरपूर प्रमानात फायबर असते. यामुळे आपली पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालते. जर तुम्ही भोपल्याच्या बियांचे अतिसेवण केले तर तुम्हाला अतिसाराच्या समस्येला सामोरे जावे लागेल. शिवाय ओटीपोटात दुखणे, पेटके आणि सूज येवू शकते. यामुळे भोपल्याच्या बियांचे सेवन योग्य प्रमाणात करावे आणि ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहे त्यांनी भोपल्याच्या बियांचे सेवन करू नये.

Related Stories

No stories found.