Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरात लावा हे फोटो

अनेकवेळा घरात विनाकारण तणाव आणि भांडणे होतात,परस्पर संबंधात कटुता आणि उदासीनता येईल, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद हवा असेल तर घरात ही फोटो लावावीत.
Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरात लावा हे फोटो
Vastu Tips: आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरात लावा हे फोटो Dainik Gomantak

वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घराबाबत अनेक विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तु टिप्समध्ये घराची दिशा, कोणती वस्तु कुठे ठेवावी, यासारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहे. वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) हे स्पष्ट केले आहे की प्रत्येक घराच्या(Home) बांधकामामुळे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा मिळतात. जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथे आनंद तर नकारात्मक ऊर्जा असते तिथे आर्थिक समस्या निर्माण होतात. वास्तुशास्त्रामध्ये (Vastushastra) घरातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी घरात भिंतीवर फोटो (Photo) लावल्यास सुख, समृद्धी लाभू शकते.

* धन प्राप्तीकरिता

जर तुमच्या आयुष्यात खूप अनेक अथक परिश्रम करून सुद्धा आर्थिक समस्या कायम राहत असेल तर मा लक्ष्मी आणि कुबेरचा फोटो ठेवावा. पण हे फोटो लावताना घराच्या उत्तर दिशेला लावावा. वास्तुशास्त्रात धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा शुभ मानली जाते. हा फोटो लावल्यास घरात धन प्राप्ती होते.

* सुंदर चित्रे

घरच्या भिंतीवर सुंदर फोटो लावावीत. असे फोटो लावल्यास घराची शोभा वाढते आणि संपत्ती देखील वाढते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर फक्त निसर्गाशी संबंधित वस्तूचे फोटो लावावे.

* हसणाऱ्या बाळाचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार घरात लहान मुलांचे हसरे फोटो असणे खूप चांगले मानले जाते. घरात नेहमी हसतमुख मुलांचे चित्र लावल्यासने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. हे फोटो पूर्व आणि उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते.

* नदी आणि धबधब्याचा फोटो

घरच्या उत्तर आणि पूर्व दिशेला नद्या आणि धबधब्यांचे फोटो लावल्यास सकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रामध्ये उत्तर आणि पूर्व दिशा शुभ मनाली जाते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com