Best Cooking Oil: खाद्य तेल खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी

Cooking Tips: स्वयंपाक करताना कोणते तेल आरोग्यासाठी लाभदायी आहे.
Best Cooking Oil
Best Cooking OilDainik Gomantak

हृदयविकाराच्या (Heart Attack) वाढत्या केसेस पाहता आजकाल लोक आहाराबाबत सतर्क झाले आहेत. विशेषतः लोकांना कमी तेलात आणि चांगल्या तेलात अन्न शिजवायला आवडते. जास्त तेलाचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. ज्या लोकांना कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. जर तुम्ही बाजारातून तेल घेत असाल तर काही गोष्टी तपासूनच तेलाची खरेदी करायला हवी.

तेल खरेदी करताना काय तपासावे?

* जेव्हाही तुम्ही बाजारातून तेल (Oil) खरेदी कराल तेव्हा केमिकली एब्स्ट्रैक्ट ऑईल एवजी प्रेस्ड ऑयल घ्या. हे तेलाच्या बाटलीवर लिहिलेले असते. 

* मोहरीचे तेल प्रेस्ड ऑयलच्या यादीत येते. ओमेगा-3, 6 आणि 9 चांगल्या दर्जाच्या तेलांमध्ये आढळतात. तेल विकत घेताना वर ओमेगा 3 आणि खाली ओमेगा 6 लिहिले आहे ते पहा म्हणजे या तेलात ओमेगा 3 जास्त आणि ओमेगा 6 कमी आहे.

* जेव्हाही तुम्ही तेल खरेदी कराल तेव्हा त्या तेलात झिरो ट्रान्स फॅट असावे. ही सर्व माहिती तुम्हाला तेलाच्या पॅकिंगच्या वरच्या लेबलवर लिहिलेली दिसेल. 

Best Cooking Oil
Eye Care Tips: डार्क सर्कलच्या समस्येवर मात करण्यासाठी या नैसर्गिक उपायांचा करा अवलंब..

* स्वयंपाक करण्यासाठी कोणते तेल चांगले आहे?
सतत एकच तेल वापरण्याऐवजी, तुम्ही तुमचे तेल वेळोवेळी बदलत राहावे. जसे तुम्ही एक महिना मोहरीचे तेल वापरले असेल तर त्यानंतर एक महिना शेंगदाण्याचे तेल वापरा. अशा प्रकारे तुम्हाला सर्व आवश्यक घटक मिळत राहतील. तुमच्या स्वयंपाकाच्या तेलात मोनो-अनसॅच्युरेटेड आणि पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स मिसळले जातात हे लक्षात ठेवा.

* तेल स्वयंपाकात कसे वापरावे  
ऑलिव्ह ऑईल, कॅनोला तेल, मोहरीचे तेल, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, तांदूळ कोंडा तेल स्वयंपाकासाठी चांगले मानले जाते. स्वयंपाक करताना एक चमचा देशी तूप, एक चमचा मोहरीचे तेल आणि एक चमचा सूर्यफूल तेल मिसळून वापरल्यास उत्तम राहते. याचे नवीन रूप म्हणजे आज बाजारात उपलब्ध असलेले मिश्रित तेल होय.

* कोणते तेल चांगले नाही?
स्वयंपाक (Cooking Tips) करण्यासाठी तेल खूप वेगाने गरम केले जाते. तेल वारंवार गरम केल्यावर त्याचे रासायनिक बंधन बदलते. याला ट्रान्स सॅच्युरेटेड फॅट म्हणतात जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्याच वेळी, हायड्रोजन जोडून अनेक प्रकारचे वनस्पती तेल तयार केले जाते. यामुळे तेलातील ट्रान्स फॅटचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. ते शरीराला खूप नुकसान करतात. ट्रान्स फॅट शरीरातील खराब कोलेस्टेरॉल वाढवते आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी करते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com