Raisins Health Benefits: मनुका खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' बदल; मानसिक विकासातही फायदेशीर

तुमच्या आहारात बेदाणे अवश्य समाविष्ट करा.
Raisins Health Benefits
Raisins Health BenefitsDainik Gomantak

Benefits of Eating Raisins Daily: तुमच्या आहारात मनुका अवश्य समाविष्ट करा. रोज बेदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मनुका अतिशय स्वस्त, आरोग्यदायी आणि चवदार असतात. सर्वात स्वस्त सुक्या मेव्यामध्ये याचा समावेश होतो. द्राक्षे सुकवून मनुका तयार करतात.

यामध्ये अनेक पोषक तत्वे आढळतात. मनुक्यामध्ये प्रथिने, लोह आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम, पोटॅशियम आणि कॉपरची कमतरता दररोज मनुका खाल्ल्याने पूर्ण होऊ शकते.

मनुका खाल्ल्याने शरीराला भरपूर अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मिळतात. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट देखील मनुकामध्ये आढळतात. मनुका जरूर खा.

Raisins Health Benefits
Food For Brain: डोकं चालेल सुपरफास्ट! आहारात समावेश करा या गोष्टींचा

मनुका खाण्याची योग्य पद्धत

तसे तर तुम्ही मनुके असेच खाऊ शकता, पण त्याचा पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी मनुके भिजवून खावे. मनुका रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी प्या. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

अशाप्रकारे मनुका खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते. याने सर्व पोषक तत्व शरीराला उपलब्ध होतात.

मनुके खायला खूप चविष्ट असतात, पण जास्त खाल्ल्याने लठ्ठपणा वाढून रक्तातील साखर वाढण्याचा धोका असतो. तुम्ही रोज फक्त 5 ते 10 मनुके खावेत.

Raisins Health Benefits
Rajgira Diet Benefits: केवळ उपवासाच्या वेळीच नाही तर रोजच्या आहारातही करा राजगिऱ्याचे सेवन

फायदे

  • मनुका खाल्ल्याने मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.

  • भिजवलेले मनुके खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यातून लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फायबर सारखे पोषक घटक मिळतात.

  • यामधून कॅल्शियम मिळते, त्यामुळे हाडे आणि दात निरोगी राहतात.

  • पुरुषांनी मनुका खावे. मनुका मधासोबत खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या वाढते.

  • दात आणि हिरड्यांमधील पोकळी दूर करण्यासाठीही मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com