चेहऱ्यावरील नॅच्युरल ग्लोसाठी कच्चे दूध उपयुक्त
Raw milk is useful for natural glow on the faceDainik Gomantak

चेहऱ्यावरील नॅच्युरल ग्लोसाठी कच्चे दूध उपयुक्त

तेलकट त्वचेसाठी कच्चे दूध लाभदायी ठरते.

चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक (Glow) टिकवून ठेवण्यासाठी अनेक महिला महागडे फेशियल करतात. पण एवढा खर्च करून सुद्धा त्यांना पाहिजे तसा चेहऱ्यावर (Face) ग्लो दिसून येत नाही. उलट चेहऱ्यांवरील त्वचा (Skin) अधिक खराब होऊ लागते. यावर एक स्वस्त आणि उत्तम उपाय म्हणजे कच्चे दूध (Milk) आहे. कच्चे दूध चेहऱ्यावर नियमितपणे लावल्यास चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकून राहते.

* नियमितपणे कच्चे दूध लावावे

कच्चे दूध त्वचेसाठी चांगले मानले जाते. रात्री चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचे अनेक फायदे आहेत. कच्या दुधात मध मिक्स करून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे लावून ठेवावे. नंतर चेहरा स्वच्छ धुवावा. तेलकट त्वचेसाठी कच्चे दूध लाभदायी ठरते. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होतो.

* मुरूम कमी करण्यास मदत

तुमच्या चेहऱ्यावर जर मुरूम असतील तर दूध आणि मधाने बनवलेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. 5 ते 10 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. असे नियमित केल्यास चेहऱ्यांवरील मुरूम कमी होतील.

Raw milk is useful for natural glow on the face
Skin Care Tips: नितळ त्वचेसाठी पालकाचे करावे सेवन

* सुरकुत्या कमी होतात

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी दूध उपयुक्त ठरते. यासाठी दुधात मध मिक्स करून चेहऱ्याला लावणे लाभदयी ठरते. आठवड्यातून दोन वेळा हे मास्क लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. तुम्ही यात अर्धा चमचा ओट्स सुद्धा टाकू शकता.

* क्लींजर म्हणून वापर

चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचा वापर करू शकता. 5 ते 10 मिनिटे चेहऱ्यावर दुधाने मसाज करावी. नंतर स्वच्छ धुवावे. असे नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील डेड स्कीन कमी निघून जाण्यास मदत मिळते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com