Valentine Day 2021: 'व्हॅलेंटाईन वीक' सेलिब्रेट करताय...मग 'व्हॅलेंटाईन डे'चा इतिहास माहिती आहे का?   

Cover.png
Cover.png

संपूर्ण जगभरात फेब्रुवारी महिन्यातील 14 तारखेला प्रेमाचा दिवस म्हणून 'व्हॅलेंटाईन डे' (Valentines Day) साजरा करण्यात येतो. त्यामुळे खासकरून तरुणाई या दिवसाची आवर्जून वाट पाहत असतात. 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेमाचे प्रतिक म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने बरेचजण आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देतात. आणि हा  'व्हॅलेंटाईन वीक' (Valentines Week) आजपासून सुरु होत आहे. परंतु प्रेमाचा हा 'व्हॅलेंटाईन डे' दिवस प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारीतील 14 तारखेलाच का साजरा करण्यात येतो? तसेच या 'व्हॅलेंटाईन डे'च्या अगोदर म्हणजे आज पासून सुरु होत असलेला  'व्हॅलेंटाईन वीक' का साजरा करण्यात येतो, याबद्दल माहिती आहे का? 

 'व्हॅलेंटाईन वीक' मध्ये साजरा करण्यात येणारे काही डेज - 

'व्हॅलेंटाईन डे' हा 14 फेब्रुवारीला सेलिब्रेट केला जातो हे सर्वांनाच माहिती आहे. या दिवसाच्या अगोदर काही डेज 'व्हॅलेंटाईन वीक' म्हणून सेलिब्रेट करण्यात येतात. 

किस डे (Kiss Day) - 13 तारीख 
हग डे (Hug Day) - 12 तारीख 
प्रॉमिस डे (Promise Day) - 11 तारीख 
टेडी डे (Teddy Day) - 10 तारीख 
चॉकलेट डे (Chocolate Day) - 9 तारीख 
प्रपोज डे (Propose Day) - 8 तारीख 
रोज डे (Rose Day) - 7 तारीख 

असे काही डेज सेलिब्रेट करण्यात येतात. त्यामुळे या संपूर्ण आठ्वड्यालाच प्रेमाचा आठवडा म्हणून संबोधले जाते. पण हे डेज का सेलिब्रेट केले जातात यावर अनेक मत-मतांतरे आहेत.    
      
'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस 14 फेब्रुवारीलाच का साजरा करण्यात येतो यावर अनेकजण वेगेवेगळी उत्तरे देताना दिसतात. काहींच्या मते 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याची पद्धत ही पूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीचा भाग आहे. तर काहीजण 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने भारतातील संस्कृती बदलण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय पाश्चात्य देशांमध्ये भांडवलशाही असल्यामुळे येथील उद्योजक आपल्या वस्तूंची मागणी वाढवण्यासाठी त्यांनी 'व्हॅलेंटाईन डे'ची पद्धत सुरु केल्याचे काही जणांचे म्हणणे असते. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवसाबाबत अनेकजण आपापल्या विचारानुसार निष्कर्ष लावून हा दिवस सेलिब्रेट करतात. इतकेच नाहीतर, देशाच्या संस्कृतीचे रक्षण करण्याच्या नावाखाली अनेकजण या 'व्हॅलेंटाईन डे'चा विरोध देखील करताना दिसतात. पण 'व्हॅलेंटाईन डे'चा इतिहास हा याहून वेगळाच आहे.   

व्हॅलेंटाईन डे' का सेलिब्रेट करण्यात येतो ? 

'व्हॅलेंटाईन डे'ची सुरवात युरोपातील रोम मध्ये सुरु झाल्याचे म्हटले जाते. रोम मध्ये तिसऱ्या शतकात यादवीसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन सतत लहान-मोठी युद्धे होत असत. आणि याच वेळेला रोमन साम्राज्याची सूत्रे क्लॉडियस (Claudius) सम्राटाच्या हातात होती. व युद्धात विजय मिळवण्यासाठी त्याने तरुणांच्या लग्नावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला होता. गृहस्थ व्यक्ती हा कधीच चांगला सैनिक होऊ शकत नसल्याचे क्लॉडियसचे मत होते. आणि याच विचारातून त्याने राज्यातील सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न करण्यावर बंदी घातली होती.

क्लॉडियसने लग्न करणाऱ्यांवर अत्याचार करण्यास सुरवात केली होती.  क्लॉडियसच्या या अत्याचारास व्हॅलेंटाईन (Valentine) या धर्मगुरूंनी जोरदार विरोध केला होता. 

व्हॅलेंटाईन यांनी क्लॉडियसला न कळता अनेकांची रितीरिवाजानुसार लग्ने लावून दिली. मात्र एकेदिवशी याची खबर क्लॉडियसला लागल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईन यांना तुरुंगात डांबण्याचे आदेश दिले. व यावेळेस व्हॅलेंटाईन यांना बंदिस्त केलेल्या तुरुंगाचा अधिकारी ऑस्टेरीअस होता. या ऑस्टेरीअसची मुलगी अंध होती. तिला व्हॅलेंटाईन यांनी ठीक केले. यानंतर व्हॅलेंटाईन यांना क्लॉडियसच्या आदेशानुसार 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आली होती. पण ऑस्टेरीअसच्या मुलीला  लिहिलेल्या अखेरच्या पत्रात सर्वात खाली फ्रॉम युवर व्हॅलेंटाईन, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे प्रेमाचा संदेश देणाऱ्या व्हॅलेंटाईन यांच्या आठवणीत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात येऊ लागला. 

प्रेमाचा दिवस 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यात येऊ लागल्यानंतर त्या पूर्वीचे काही दिवस हे प्रेमाशीच संबंधित डेज म्हणून सेलिब्रेट होऊ लागले. आणि कालांतराने दरवर्षाच्या फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात हे डेज साजरे करण्यात येऊ लागले आहेत. या आठवड्यात सर्वजण आपल्या आवडत्या व्यक्तीला रोज (Rose), चॉकलेट (Chocolate) आणि गिफ्ट्स (Gifts) देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com