टोफू मसालेदार भाजीची जाणून घ्या रेसिपी

सोयाबीन पनीरला टोफू बोलल्या जाते.
टोफू मसालेदार भाजीची जाणून घ्या रेसिपी
Learn Tofu Spicy Vegetable RecipeDainik Gomantak

तुम्ही अनेक वेळा पनीरची (Paneer) भाजी खाल्ली असेल पण तुम्ही टोफूची (Tofu) भाजी खाल्ली आहे का? जर नाही तर आज लगेच टोफूची भाजी बनवून पहा. टोफू हे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर आहे. ही भाजी खायला सुद्धा चवदार असते. सोयाबीन पनीरला टोफू बोलल्या जाते. यात प्रथिने मुबलक प्रमाणात असते. जर तुम्हाला पनीर आवडत नसेल तर तुम्ही पर्याय म्हणून टोफूचे सेवन आपल्या आहारात करू शकता.

* साहित्य

* दोन कप टोफू

* दोन मोठे टोमॅटो

* एक कांदा

* शिमला मिरची

* पाती कांदा

* जिरं

* अदरक

* आले

* लाल मिरची पावडर

* धणे पावडर

* गरम मसाला

* तेल

* बारीक चिरलेली कोथिंबीर

Learn Tofu Spicy Vegetable Recipe
Navratri Special Food: घ्या नमकीन ड्राय फ्रुट्सचा स्वाद

* कृती

सर्वात पहिले कढईत टोफू तेलात तळून घ्यावे.

नंतर एका पॅनमध्ये जिरे, कढीपत्ता आणि आले घाला, नन्यत्र त्यात चिरलेले टोमॅटो, मीठ, हळद टाकावे.

टोमॅटो शिजल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि धणे पावडर टाकावे.

नंतर यात कांदा, शिमळ मिरची टाकून शिजू द्यावे. नंतर यात टोफू टाकावे.

वरुण गरम मसाले घालावे,नंतर थोडा वेळ झाकून ठेवावे. 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.

शेवटी सजावटीसाठी चरलेली कोथिंबीर टाकावी. तयार आहे सवदिष्ट टोफूची भाजी.

* टोफू बनवताना ही काळजी घ्यावी

* टोफुला जास्त वेळ शिजवू नये

* तुम्ही टोफू सॅलडमध्ये टाकून सुद्धा खाऊ शकता.

* टोफूची चव अधिक वाढवण्यासाठी टोफू ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवावे.

Related Stories

No stories found.