Emotional Connection With Partner : जोडीदारासोबत अशाप्रकारे वाढवा भावनिकता; मग नात्यात राहणार नाही एकटेपणा

Relationship With Partner : कपलमधील भावनिक संबंध त्यांच्या नात्याला अजून घट्ट बनवतो.
Emotional Connection With Partner | Relationship Tips
Emotional Connection With Partner | Relationship Tips Dainik Gomantak

Emotional Connection With Partner : कपलमधील भावनिक संबंध त्यांच्या नात्याला अजून घट्ट बनवतो. पण आजच्या काळात दोघेही लग्नाआधी नोकरी करत असतात आणि लग्नानंतरही ते एकमेकांसाठी तेवढा वेळ काढू शकत नाहीत. एक जोडीदार काम करत असेल आणि दुसरा नसेल, तर काम न करणाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते.

त्याला असे वाटते की त्याला काही किंमत नाही किंवा त्याचा जोडीदार त्याच्यावर खुश नाही. आजच्या काळात नोकऱ्यांची खूप मागणी झाली आहे हे आपण नाकारू शकत नाही. येथे स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढणे सोपे नाही. अशा परिस्थितीत पती-पत्नीच्या नात्यावरही परिणाम होतो. (Relationship tips Emotional Connection With Partner couple Lifestyle)

Emotional Connection With Partner | Relationship Tips
Mistakes in Relationship : प्रेमजीवनात 'या' चुका तुम्हाला पडू शकतात महागात; वेळीच घ्या जाणून

जेव्हा वेदना, अविश्वास, दुर्लक्ष केल्यासारख्या भावना नातेसंबंधात दुरावा निर्माण करतात तेव्हा जोडप्यांच्या नात्यावर नक्कीच परिणाम होतो. तुमच्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या कसे जोडले जावे याबद्दल काही गोष्टी येथे सांगण्यात येत आहेत. यातून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सखोल भावनिक नाते निर्माण करू शकता आणि नात्यातील दुरावा, एकटेपणा दूर करू शकता.

नात्यातील प्रेम कसे वाढवायचे?

प्रेम आणि आपुलकीची सुरुवात एकमेकांना सुखावह वाटणे, एकमेकांची स्तुती करणे आणि एकमेकांच्या चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कृतींबद्दल प्रशंसा करणे यापासून होते. म्हणूनच दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर तुमच्या जोडीदाराची स्तुती करा. प्रत्येकाला स्तुती आवडते आणि त्यामुळे चांगल्या कृतींबद्दलचा उत्साहही वाढतो. (Couple Lifestyle)

Happy Couple | Emotional Connection With Partner
Happy Couple | Emotional Connection With PartnerDainik Gomantak

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या दिसण्याची स्तुती करत असाल, त्याच्या ड्रेसिंगची स्तुती करत असाल, तर तुम्ही असे केल्याने त्याला प्रत्येक वेळी चांगले कपडे घालण्याची प्रेरणा मिळते. यामुळे त्यांनाही आनंद होतो आणि त्यांना आनंदी पाहून तुम्हालाही आनंद होतो.

  • रुटीन लाईफ बदला

आपले जीवन मनोरंजक ठेवण्यासाठी, आपण वेळोवेळी आपली दिनचर्येमधून एकमेकांसाठी वेळ काढणे आवश्यक आहे. वेळ काढून दोघांनी एकत्र फिरायला जा. कधी चालत चालत जवळच्या कॉफी शॉपमध्ये जाऊन एकमेकांशी छान गप्पा मारा, कधी लांबच्या सहलीचा प्लॅन करून जोडीदारासाठी वेळ घालवा. असे केल्याने नाते अधिक घट्ट होऊन एकमेकांबद्दलचे प्रेम अजून वाढेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com