Relationship Tips: प्रेमात कधी-कधी खोट बोलणे टिकवू शकते तुमचे नाते

जेव्हा आपण एखाद्याशी प्रेमाचे नाते जोडतो तेव्हा आपण खूप आनंदात असतो आणि ते नाते अधिक काळ टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपण करतो.
Relationship Tips: प्रेमात कधी-कधी खोट बोलणे टिकवू शकते तुमचे नाते
Healthy Relationship TipsDainik Gomantak

जेव्हा आपण एखाद्याशी प्रेमाचे नाते जोडतो तेव्हा आपण खूप आनंदात असतो आणि ते नाते अधिक काळ टिकण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी आपण करतो. प्रत्येक नात्याचा पाया प्रेम आणि विश्वास असतो. जगात क्वचितच असा कोणी तरी असेल जो खोटे बोलत नाही. नात्यात प्रामाणिक असणं खूप गरजेचं असतं पण कधी कधी नातं वाचवण्यासाठी लहानसहान खोटं बोलावचं लागतं. जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा असे अनेक प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला खोटे बोलावे लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खोट्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल. (Relationship Tips Sometimes lying in love can sustain your relationship)

Healthy Relationship Tips
उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे 5 पेय फायदेशीर

जर नात्यामध्यय गोष्टी खराब होत असतील तर तुम्ही खोटे बोलू शकता

पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून भांडणे किंवा वाद होणे हे सामान्यच आहे. कधी-कधी तुम्ही दोघंही या बाबतीत बरोबर असता, पण कधी-कधी गोष्टी बिघडताना पाहून तुम्ही तुमच्या जोडीदाराला बरोबर सांगून भांडण संपवण्याचा प्रयत्न करत असता. आणि हे एक खोटे तुमचे नाते तुटण्यापासून वाचवते. तुमचं म्हणणं बरोबर असलं तरीही कधीतरी असं खोटं बोलायला हवं.

खोटी प्रशंसा देखील महत्वाची असते,

प्रत्येकाला आपल्या जोडीदाराने स्मार्ट दिसावे आणि चांगले कपडे घालावे असे वाटत असते, परंतु कधीकधी आपल्याला त्यांचा ड्रेसिंग सेन्स अजिबात आवडत नाही आणि आपण त्यांना सांगण्यास कचरत असतो. अशा वेळी तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलता की ते छान दिसतात पण नातं घट्ट होण्यासाठी असं छोटं खोटं कधीतरी बोलावं लागतं. बायका त्यांच्या शॉपिंग बॅग गाडीत सोडून नवरा गेल्यावरच घरी त्या बॅग आणतात हा जरा जुना फंडा आणि जुना विनोद आहे. मात्र, हा विनोदही बऱ्याच अंशी खरा आहे. बहुतेक बायका त्यांच्या पतींना त्यांच्या खरेदीच्या लांबलचक यादीबद्दल सांगतच नाहीत. एवढेच नाही तर आजही 50% पती असे आहेत ज्यांना त्यांच्या पत्नीच्या खरेदीची माहितीही नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com