Relationship Tips: गर्लफ्रेंड रागावली असेल तर या 5 गोष्टी चुकूनही बोलू नका

तुम्हाला जर नातं टिकून ठेवायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Relationship Tips: गर्लफ्रेंड रागावली असेल तर या 5 गोष्टी चुकूनही बोलू नका
Relationship TipsDainik Gomantak

ज्या नात्यात भांडण आणि दुरावा नाही त्या नात्यात हे समजले पाहिजे की ते नाते मनाने नाही तर डोक्याने निभावले जाते. पण कधी-कधी जोडप्यांच्या नात्यातल्या काही गोष्टींवरून किंवा वादामुळे गर्लफ्रेंड नाराज होते. नाराजीनंतर प्रत्येक प्रियकर आपल्या प्रेयसीचे मन वळवण्याचा प्रयत्न करतो. मन वळवताना अनेकवेळा तो रागाच्या भरात अशा गोष्टी बोलून जातो, ज्यामुळे ती अधिकच चिडतो किंवा तुमचे नातेही तुटू शकते. आता अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या रागवलेल्या गर्लफ्रेंडशी बोलणे टाळावे? (Relationship Tips News)

* हे तुझे नेहमीचेच नाटक आहे

काही नात्यांमध्ये अनेक छोट्या गोष्टीवरून दुरावा येऊ शकतो. जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यावर नाराज झाली असेल तर 'हे तुझे नेहमीचेच नाटक आहे' असे बोलनं टाळावे.

* तु प्रेमाच्या लायक नाही

तुला प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर वाद घालायचा आहे. तु प्रेमाच्या लायक नाही. अनेक वेळा मुले रागावलेल्या गर्लफ्रेंडशी असे शब्द वापरतात. पण असे शब्द बोलणे टाळावे. रागावलेल्या गर्लफ्रेंडला असं काही बोललं तर ती अधिक नाराज होते.

Relationship Tips
Soya Badi Curry Recipe: झटपट बनवा स्वादिष्ट सोया बडी करी

* तुला जेव्हा बोलायचे तेव्हा बोल

कधीकधी गर्लफ्रेंड्सना वाटते की तुम्ही त्यांना समजून घ्यावे आणि भांडणाचे खरे कारण जाणून घ्यावे. पण रागावलेल्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) तुला जेव्हा बोलायचे तेव्हा बोल ' असं रागाने म्हटलं तर हे खूप चुकीचं ठरेल.असे केल्याने तुमच्या मैत्रिणीला असे वाटेल की तुम्ही तिला समजून घेऊ शकत नाही आणि तिच्या नाराजीला तुमच्या नजरेत काहीच किंमत नाही, त्यामुळे अशा गोष्टी बोलणे टाळा.

मी तुझ्यावर प्रेम करून चूक केली

'तुझ्यावर प्रेम करूनच माझी चूक झाली', असे तुमच्या गर्लफ्रेंडला कधीही बोलू नका. रागावू नकोस, अगदी सामान्यपणे असं बोलणं टाळा. ही गोष्ट गर्लफ्रेंडला सर्वात वाइट वाटु शकते. तुमचे रिलेशन तुटु शकते.

तुझ्यापेक्षा माझी एक्स चांगली होती

तुमची गर्लफ्रेंड रागावली असताना, उदाहरण देऊन किंवा टोमणे मारून 'तुझ्यापेक्षा माझी एक्स चांगली होती' म्हणाल तर असे बोलणं टाळा. ही गोष्ट गर्लफ्रेंडला सर्वात वाइट वाटुन तुमचे रिलेशन तुटु शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com