Frequent Urination: तुम्हालाही रात्री वारंवार लघवीचा त्रास होतो? या उपायांनी मिळेल आराम

लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे, अल्कोहोल, कॉफी, दही यासारख्या पेयांच्या सेवनाने देखील लघवीचा त्रास होऊ शकते.
Frequent Urination
Frequent UrinationDainik Gomantak

दिवसभराचा थकव्यावर रामबाण औषध म्हणजे रात्रीची झोप. पण, रात्रीची वारंवार झोपमोड झाल्यास खूप त्रास होतो. रात्रीचे वारंवार लघवीला झाल्यास देखील झोपमोड होते. त्यामुळे रात्रीचे वारंवार लघवीला होणे ही एक मोठी समस्या असू शकते. सामान्य वाटत असले तरी ते अनेक मोठ्या आजारांचे लक्षणही असू शकते. वाढत्या वयाबरोबर ही समस्या वाढत जाते. लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे, अल्कोहोल, कॉफी, दही यासारख्या पेयांच्या सेवनाने देखील लघवीचा त्रास होऊ शकते.

Frequent Urination
Twitter Verified: ट्विटरमध्ये आणखी एक महत्वपूर्ण बदल, आता व्हेरिफाईड अकाऊंट तीन रंगात

रात्री वारंवार लघवीचा मधुमेह, ओव्हरएक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम, मूत्रमार्गात संसर्ग किंवा प्रोस्टेट संबंधित आजाराशी संबंध असतो. त्यामुळे डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. या समस्येमुळे रात्रीची झोप खराब होतेच, तसेच इतर समस्या देखील उद्भवू शकतात.

- तुम्हाला स्लीप एपनियाचा त्रास तर नाही ना हे तपासून घ्या. यामुळे रात्रीची गाढ झोप लागत नाही, त्यामुळे शरीरात अँटीड्युरेटिक हार्मोन्स बाहेर पडत नाहीत. हे हार्मोन्स गाढ झोपेत लघवीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. स्लीप एपनियामध्ये किडनीतून जास्त पाणी उत्सर्जित होते आणि त्यामुळे रात्री वारंवार लघवी होण्याची समस्या (नोक्टुरिया) आणखी वाढते. स्लीप एपनियाचा उपचार केल्यास वारंवार लघवीचा त्रास थांबू शकतो.

Frequent Urination
Emily Sotelo: 48 शिखरे सर करणाऱ्या 19 वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू, 3 दिवसांनी सापडला मृतदेह

- खाण्यापिण्याची काळजी घ्या. झोपेच्या 2 तास आधी कोणतेही पेय घेऊ नका, तसेच दिवसभर मद्य आणि कॉफीचे सेवन टाळा.

- हात-पाय सुजणे हे देखील रात्री वारंवार लघवी होण्याचे कारण असू शकते. यासाठी नियमित व्यायाम करा.

- उच्च रक्तदाबासाठी लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे घेत असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर दिवसभरासाठी औषधाची वेळ ठरवा. जेणेकरून रात्री शौचाला जाण्याचा त्रास तुम्हाला होणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com