Restaurants in Goa: 'जिला बेकरी'; बेकरी उत्पादन निर्मीतीतले महत्वाचे नाव

Jila Bakery: बेकरी उत्पादन (bakery products) निर्मितीत अतिशय महत्वाचं स्थान निर्माण केलेल्या जिला बेकरीच्या इतिहास देखील रंजक आहे.
Jila Bakery Famous name in the Manufacture of bakery products in Goa
Jila Bakery Famous name in the Manufacture of bakery products in GoaDainik Gomantak

2007 च्या निवडणुकीच्या वेळी काही लोकांशी चर्चा करण्यासाठी लोटली गावात गेले होते. काही मुद्दे काढले होते ज्यावर स्थानिक लोकांची भूमिका काय आहे जाणून घ्यायचं होतं. एका गृहस्थांच्या अंगणात आमची चर्चा रंगली होती. ती व्यक्ती अतिशय तावातावाने बोलत होती. माझं लक्ष थोडं विचलित होत होतं. नाकाला एक वेगळाच सुवास जाणवू लागला. विचलित करणाऱ्या या सुवासाने जवळ कुठे तरी बेकरी असल्याचं लक्षात आणून दिलं. गोव्यातल्या (Goa) जुन्या बेकरी (Bakery) बघण्याची मला कायम उत्सुकता वाटते. पारंपरिक पद्धतीची भट्टी, त्या भट्टीची रचना, बनवले जाणारे पदार्थ याबद्दल जाणून घ्यायला आवडतं. तर महाशयांची चर्चा संपताच आम्ही मोर्चा वळवला तो बेकरीच्या दिशेने. कारण त्या सुवासाने आम्हाला लपेटून टाकलं होतं आणि तो टाळून या गावातून निघून जाणं शक्य नव्हतं. लोटलीतली ' जिला' बेकरी (Jila bakery) खूप प्रसिद्ध आहे. नाव ऐकून होते पण लोटलीला मुद्दाम असं जाणं झालं नव्हतं. (Restaurants in Goa: Jila bakery is Famous name in the manufacture of bakery products in Goa)

Delicious Product of jila baker
Delicious Product of jila bakerDainik Gomantak

1972 साली जोस अंताव यांनी जिला बेकरी सुरु केली. यशस्वी आणि अयशस्वी होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला रंजक इतिहास असतो. बेकरी उत्पादन निर्मितीत अतिशय महत्वाचं स्थान निर्माण केलेल्या जिला बेकरीच्या इतिहास देखील रंजक आहे. लोटलीतील आंबोरा भागात जोस अंताव यांचं मूळ घर आहे. जोस आता हयात नाहीयेत. 2005 साली त्यांचं निधन झालं. 1930 च्या दशकात जोस मुंबईला उदरनिर्वाहासाठी गेले आणि त्यांना थोड्या दिवसात ताज हॉटेलमध्ये नोकरी मिळाली. हि नोकरी त्यांच्या आयुष्याला आणि त्यांच्या करिअरला वळण देणारी ठरली. इथे त्यांनी भांडी धुण्यापासून - केक पेस्ट्री मोल्ड साफ करण्यासारखी कामं केली. पण अंगातली उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. थोड्याच अवधीत त्यांनी इटालियन शेफच्या हाताखाली राहून इटालियन पेस्ट्री शिकून घेतली.

Jila Bakery Famous name in the Manufacture of bakery products in Goa
Restaurants in Goa: गोमंतकीय चव जपणारे कोकणी कँटीन

बेकरीतले वेगवेगळे पदार्थ त्यांना मोहित करत होते. त्यांनी हळूहळू सगळे प्रकार शिकून घेतले. पुडिंग बनवण्यात त्यांचा हातखंडा होता आणि त्यांची ओळख देखील ' पुडिंगवाला' म्हणून झाली होती. जोस जेव्हा केव्हा गोव्याला आपल्या गावी परत येत तेव्हा गावातल्या लोकांकडून त्यांचं कौतुक व्हायचं. ' तू मुंबईत प्रसिद्ध असशील, पण गावात तुझं कौशल्य कोणाला माहितीये' असं त्यांचे मित्र त्यांना ऐकवायचे. मित्रांचं बोलणं त्यांच्या मनात राहिलं होतं. 1970 च्या दशकात त्यांनी मुंबईहून गोव्याला आपली गावी परतायचा निर्णय घेतला. गावी येऊन त्यांनी आपल्या मूळ घरात बेकरी सुरु केली. आपण कमावलेलं कौशल्य दाखवण्याची वेळ आलीय असं तर त्यांना वाटलं नसेल ना?

Delicious Product of jila baker
Delicious Product of jila bakerDainik Gomantak

Dainik Gomantak

'जिला'चे वेगळेपण

'जिला' नाव ठेवताना देखील त्यांनी घरातल्या सर्वाना महत्व दिलं. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावाच्या अद्याक्षरातून म्हणजेच स्वतः जोस मधला J, इनासिओ मधलं I, लुडोविना मधलं L आणि अंताव मधला A या साऱ्यांवरून ' जिला ' हे नाव ठेवण्यात आलं. बेकरीमध्ये एरवी मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा वेगळं काहीतरी बनवावं या ध्यासानं त्यांना झपाटलं होतं आणि याच झपाटलेपणामुळे आज 'जिला'ला इतर बेकरीच्या तुलनेत वेगळेपण लाभलंय.

जोसने बेकारीचा मेनू तयार केला. इटालियन शेफच्या हाताखाली 'पफ पेस्ट्री' शिकून घेतली होती तिचा इथे छान उपयोग झाला. त्या पाककृतींमध्ये बदल करून त्यांनी 'इक्लेअर' नावाची नवी पफ पेस्ट्री बनवली. पफला असतात तसे खुसखुशीत पापुद्रयांचे अनेक स्तर त्यावर चॉकलेटची एक लेअर आणि पफच्या आतल्या भागात जोसने बनवलेला सिक्रेट व्हाईट क्रीम असा पूर्णपणे एका पेस्ट्रीमध्ये डबल धमाका अनुभवायला मिळतो.

इक्लेअर चॉकलेट जसं होतं - त्यात चॉकलेट पण आणि त्यात रसाळ कॅडबरी पण खायला मिळायची, तसंच या इक्लेअर पेस्ट्रीमध्ये खुसखुशीत पफ खाल्ल्याचं समाधान आणि त्यासोबत चॉकलेट आणि व्हाईट क्रीम खाण्याचा छानसा आनंद मिळतो. 'इक्लेअर पफ पेस्ट्री ' हि जिला बेकरीची अतिशय वेगळी निर्मिती आहे. यातलं सर्वात महत्वाचा भाग आहे ते आतल्या भागात असलेलं व्हाईट क्रीम. ज्याची रेसिपी एकदम गुप्त ठेवण्यात आली आहे. त्यामुळे अजून पर्यंत दुसऱ्या कोणत्याही बेकरीला त्याची कॉपी करता आली नाहीये.

Delicious Product of jila baker
Delicious Product of jila bakerDainik Gomantak

जिलमधलं आणखी 'पाखा' नावाचं बिस्कीट देखील खूप प्रसिद्ध आहे. 'पाखा' म्हणजे पंख. बिस्किटाचा आकार पंखांसारखा म्हणून त्याला 'पाखा' म्हणलं जाऊ लागलं. पण पुढे इथल्या ग्राहकांनी आपापल्या परीने त्याचे वेगवेगळं नामकरण केलं. प्रॉडक्ट एकच पण ग्राहकांप्रमाणे त्याचं नाव बदलत गेल्याचं पाहिलंच उदाहरण मी बघितलं. कोणी याला 'एन्जल विंग्ज' म्हणतात तर कोणी याला ' कुत्र्याचे कान ' गावाबाहेरचे लोक याला 'लोटली बिस्किटं' म्हणून ओळखतात. या एंजल विंग्स कुरकुरीत बिस्किटांवर हलक्या हाताने साखर पेरणी करतात. तोंडात टाकताच त्याचा कुरकुरीतपणा आणि जीभेवर हळुवारपणे पसरत जाणारी साखरेची गोडी यांची सुंदरशी चव पुढे कितीतरी वेळ जाणवत राहते.

Jila Bakery Famous name in the Manufacture of bakery products in Goa
Restaurants in Goa: गोव्यात येताय? मग येथील भाजी-पाव एकदा खाऊन पाहाच

बेकरीने पन्नास दशकं पूर्ण केली पण आजही तीच चव अनुभवयाला मिळते. यातलं आणखी वेगळेपण म्हणजे हि बेकरी आजही पारंपरिक पद्धतीने चालवली जाते. आजही इथली भट्टी हि मातीची आणि लाकडावर जळणारी आहे. आता या कुटुंबातली तिसरी पिढी व्यवसायात लक्ष घालू लागलीय. नव्या पिढीला मात्र इलेक्ट्रिक भट्टी वापरावीशी वाटते. नव्या तंत्रज्ञानाने व्यवसायात आणखी वाढ होऊ शकते असं वाटतं. पण मागच्या पिढीतल्या सदस्यांना मात्र आजही पारंपरिक तंत्र वापरलेलं जास्त आवडतं.

आपलं मूळ घर अडगळीत पडू नये म्हणून स्वर्गीय जोस यांनी इथेच बेकरी व्यवसाय सुरु केला. हे त्यांचं मूळ घर देखील जिलाच्या अस्तित्वाचा महत्वाचा भाग आहे. इथं स्वागत देखील अगदी घरगुती पद्धतीने होतं. खास इंडो -पोर्तुगीज शैलीतील घराला बाहेरच्या बाजूला बसायला असणारे 'बालकाव'वर अनेक गिऱ्हाईक भट्टीतून भाजून येणाऱ्या गरम गरम पावाची वाट बघत बसलेले दिसतात. घराचा व्हरांडा या अशाच लोकांनी व्यापलेला असतो. बेकरीबद्दल माहिती देताना इथल्या प्रत्येक सदस्याला अतिशय अभिमान वाटतो. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री आठपर्यंत जिला बेकरी उघडी असते. अनेक पर्यटक गुगल मॅपच्या आधारे जिला बेकरी शोधत येतात. पोटभर इक्लेअर खातात. भरपूर फोटो काढतात आणि तृप्त मानाने परतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com