Restaurants in Goa: पणजीतला तंदुरी चहा

तंदूर चहा गोव्याच्या राजधानीत आलेला आहे. मातीच्या मडक्याचा मधूर गंध घेऊन हा चहा येतो. एक नव प्रयोग म्हणून पणजीत आल्यावर हा चहा प्यायला हरकत नाही.
Restaurants in Goa: Panaji Tandoori Tea
Restaurants in Goa: Panaji Tandoori TeaDainik Gomantak

पुण्यात माझ्या ऑफिसच्या आजूबाजूला उत्तम चहा मिळणारी अमृततुल्य होती. अमृततुल्य म्हणजे जिथे प्रामुख्याने फक्त चहा मिळतो. गोव्याच्या तुलनेत स्वस्त आणि चवीलादेखील उत्तम असा हा चहा आहे. गोव्यात आल्यावर, फिल्डवर फिरत असताना अशा चहाची प्रचंड उणीव भासायची. ढवळून ढवळून केलेला छान घट्ट चहा (Tea) पुण्यात कुठेही गेल्यावर सहजपणे मिळतो. रस्त्यावर उभं राहून झटपट चहा पिऊन मार्गी लागता येतं.

आतातर पुण्यात नको इतके वेगवेगळ्या पध्दतीची अमृततुल्य झाले आहेत. प्रत्येकजण आपल्यापरीने वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी मटका चहाची टूम पुण्यात निघाली. मग ‘तंदुरी चहा’ बद्दलही कोणाकडून ऐकायला मिळालं. तंदुर रोटी माहीत होतं. तंदुरी कबाब माहीत होते, पण तंदुर चहा कधी ऐकिवात नव्हतं. काय असेल हा प्रकार याची उत्सुकता होती. परवा ऑफिसमधील एकाने तंदुर चहा (Restaurants in Goa) आता पणजीत मिळतो असं सांगितलं. मग आमची टीम लगेच संध्याकाळी तंदुर चहा प्यायला पोहोचलीच तिथे.

Restaurants in Goa: Panaji Tandoori Tea
Restaurants in Goa: 'कुट्टीकर बार अँड रेस्टोरंट'मध्ये गेल्यावर काय खावं?

पणजीतली सांतिनेज भागात गणपती मंदिराजवळ ‘विमल शोरमा सेंटर’ नावाच्या हॉटेलमध्ये हा तंदुर चहा सुरू झाला आहे. शोरमा सेंटर जरी म्हणलं असलं तरी इथं अस्सल कोल्हापुरी पध्दतीचे पदार्थ मिळतात. मिसळ, पिठलं भाकरी, भरल्या वांग्याची भाजी, बटाटावडा त्यांची खासियत आहे.

Restaurants in Goa: Panaji Tandoori Tea
Restaurants In Goa: 'राईथ' नव्या जुन्याचा संगम

आम्ही मुद्दाम तंदुर चहा प्यायला गेलो. तंदुरमध्ये गरम केलेल्या मडक्यात आधीच तयार करून ठेवलेला चहा घालून छान सळसळून मग कपात घालून देतात. त्या गरम केलेल्या मातीच्या मडक्यांची हलकीशी चव त्यात उतरते. मी आता कायम बिनसाखरेचा चहा पिते त्यामुळे मला हा चहा चांगलाच गोड लागला. पण त्याला तसं सांगितलं तर तो कमी साखर असलेला चहा देऊ शकतो. चहाची चव मात्र खूपच छान आहे. पणजीत तंदुर चहा हा प्रकारच नवीन आहे. त्यामुळे सध्या त्यालाच खूप मागणी आहे. कधी पणजीत असाल तर मुद्दाम पिऊन बघा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com