Causes Of Heart Attack: तरुणपीढी अडकत चाललीय हृदयविकाराच्या विळख्यात

तज्ञांच्या मते कोविड -19 साथीच्या काळात या संख्येत आणखीनच भर पडली आहे. ही अत्यंत गंभीर्याची बाब असून, या लक्षणांबद्दल आपण जागरूक असणे महत्वाचे आहे.
Causes Of Heart Attack: तरुणपीढी अडकत चाललीय हृदयविकाराच्या विळख्यात
Health Care Tips For Heart Dainik Gomantak

हृदयविकाराचा धोका हा प्रत्येक वयात वाढत आहे. तरुण (Young) आणि मध्यमवयीन लोकांमध्ये विशेषतः 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका (Heart attack) येण्याचे प्रमाण वाढले असून, तज्ञांच्या मते कोविड -19 (Covid 19) साथीच्या काळात या संख्येत आणखीनच भर पडली आहे. ही अत्यंत गंभीर्याची बाब असून, या लक्षणांबद्दल आपण जागरूक असणे महत्वाचे आहे, जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) आकडेवारी नुसार 30-50 वयोगटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका गेल्या 10 वर्षांपासून दरवर्षी 2 टक्क्यांनी वाढला आहे.

Health Care Tips For Heart
Monsoon Infection पासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

डॉक्टरांच्या म्हणण्या नुसार अचानक येणारा हृदयविकाराचा झटका हा हृदयातील रक्तवाहिन्यासंबंधी असतो तसेच खाण्याच्या सवयी, बदलती आधुनिक जीवनशैली, बैठी कामे, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनातील वाढता मानसिक तणाव या कारणामुळे हृदयविकाराचा धोका आणखीनच बळावत आहे.

या कारणांमुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका

 • दैनंदिन जीवनातील तेलकट आहार ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढून हार्ट ब्लॉकेजेस वाढतात.

 • बैठी कामे या मुळे शरीराची हालचाल मंदावते

 • दैनंदिन जीवनातील ऐतेपणा

 • मानसिक तणाव

 • -धूम्रपान आणि तंबाखूचा अति वापर.

Health Care Tips For Heart
Post Covid Side Effects: कोरोनामुळे जाऊ शकतो आवाज

अचानक हृदयविकाराचा झटका येण्याची सर्वात गंभीर लक्षणे:

 • वारंवार छातीत दुखणे

 • मळमळ

 • अपचन

 • घाम येणे

 • थकवा

 • हलके डोके

 • खांद्यापर्यंत किंवा जबड्यापर्यंत वेदना होणे

ज्यांना ही लक्षणे जाणवत आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आणि हे लक्षात ठेवा दोन वेगळ्या लोकांना हृदयविकाराच्या झटक्याची समान लक्षणे असतीलच असे नाही.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com