Rose Day 2023: रोज डे निमित्त जाणून घ्या गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा वेगळा अर्थ, रंग दर्शवतो तुमच्या फीलिंग

प्रत्येक गुलाबाच्या फुलाचा रंग वेगळा असतो, प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा असतो.
Rose Day 2023
Rose Day 2023Dainik Gomantak

Rose Day 2023: व्हॅलेंटाईन वीकचा आज पहिला दिवस आहे. आज प्रेमीयुगल एकमेकांना रोज देउन राज डे साजरा करतात. गुलाबाचा प्रत्येक रंगाचा अर्थ वेगळा आहे.

गुलाबाचा सुगंध त्यांच्या प्रियजनांपर्यंत तर पोहोचतोच पण त्यांच्या मनातील शब्दही मोजक्या शब्दांत पोहोचवतो. गुलाबाचा प्रत्येक रंग तुमच्या फिलींग दर्शवतो.

  • पांढरा गुलाब

पांढरा गुलाब शांततेचे प्रतिक आहे. जर तुमचे कोणाशी भांडण झाले असेल आणि तुम्हाला ती गोष्ट शांततेने संपवून नवीन सुरुवात करायची असेल तर पांढरा गुलाब देउ शकता.

  • गुलाबी गुलाब

 गुलाबी रंगाचे गुलाब देणे म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणायचे आहे. जर कोणी तुमच्यासाठी काही केले असेल तर त्याचे आभार मानण्यासाठी तुम्ही गुलाबी गुलाब देउ शकता.

  • केशरी गुलाब

केशरी गुलाब देणे म्हणजे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. केशरी गुलाबाचा अर्थ उत्साही असणे आहे. हा रंग प्रेमात एकमेकांबद्दलची आढ सांगतो. 

Rose
RoseDainik Gomatak
  • पिवळा गुलाब

पिवळा गुलाब देणे म्हणजे तुम्ही मैत्रीकडे (Frinedship) हात पुढे करत आहात. तसेच पिवळा रंग आनंदाचे प्रतीक आहे. रोझ डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या मित्राला पिवळा गुलाब देऊ शकता.

  • पीच गुलाब

पीच रंगाचे गुलाब तुमची प्रामाणिकता, तुमची प्रामाणिकता आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. जर तुम्ही पीच रंगाचा गुलाब दिला तर ते "धन्यवाद" म्हणण्याचे प्रतीक मानले जाते.

  • लाल गुलाब

लाल गुलाब देणे म्हणजे तुमचे प्रेम व्यक्त करणे. जर तुमचे कोणावर खूप प्रेम असेल तर तुम्ही त्यांना लाल गुलाब देऊ शकता. लाल गुलाब हे प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक आहे. यामुळेच लाल गुलाब हे प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य माध्यम मानले जाते.

  • तर, या व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा मित्राला कोणत्याही रंगाचा गुलाब देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com