Saffron Water महिलांच्या त्या दिवसांत फायदेशीर

केसर पाणी पिल्याने त्वचा चमकण्यास आणि निरोगी राहण्यास मदत मिळते.
Saffron Water महिलांच्या त्या दिवसांत फायदेशीर
Saffron Water BenefitsDainik Gomantak

आपण अनेक पदार्थ स्वयंपाकघरात वापरतो. अनेक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यात केसर हा एक असा पदार्थ आहे की ज्याचे आरोग्यसाठीच नव्हे तर त्वचेसाठी सुद्धा फायदे होतात.

* त्वचा निरोगी राहते

केसर आपल्या त्वचेसाठी (Skin )फायदेशीर आहे. यामुळे त्वचा चमकण्यास (Glow) आणि निरोगी राहण्यास मदत करते. केसरमध्ये अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. जो टॉक्सिन बाहेर काढण्यास मदत करते. तसेच फ्री रेडीकल्समुले होणारे नुकसान टाळते. केसरचे पाणी (Saffron Water) पिल्याने त्वचा (Skin) हायड्रेट आणि पोषण (Nutrition) देण्यास मदत करते. यामुळे मुरूम, आणि त्वचेच्या इतर समस्या दूर होतात. नियमितपणे केसरचे पाणी पिल्यास चेहऱ्यावर ग्लो येतो.

* मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांवर फायदेशीर

जर मासिक पाळी नियमित येत नसेल तर केसरचे पाणी (Saffron Water) पिल्यास हा त्रास कमी होतो. मासिक पाळी येण्याच्यापूर्वी केसर पाणी पिल्यास होणाऱ्या वेदना कमी होतात. मासिक पाळी रक्तस्त्राव होत नसेल तर या पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या कमी होते. कारण केसरमध्ये हीटिंग एजंट्स असतात. जर आधीच मासिक पाळी रक्तस्त्राव होत असेल तर या पाण्याचे सेवन करू नये.

Saffron Water Benefits
Skin Care Tips: सन टॅनवर उपचार करण्याचे सर्वोत्तम मार्ग

* कॅफीनयुक्त पेय

जर तुमची सकाळ चहा आणि कॉफी पिल्याशिवाय पूर्ण होत नसेल तर तुम्ही केसरचे पाणी (Saffron Water) पर्याय म्हणून वापरू शकता.केसारचे पाणी आपल्याला दिवसभर फ्रेश ठवते आणि शरीर हलके वाटते.

* केस गळणे कमी होते

अनेक लोकांना केस गळण्याची समस्या असते. यासाठी ते पार्लरमध्ये जावून खूप पैसे खर्च करतात.पण तरीसुद्धा केस गळणे कमी होत नाही. यासाठी केसरचे पाणी गुणकारी ठरते . केसरमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे केस गळणे कमी होते. केसांच्या मुळा मजबूत होण्यास केसचे पाणी (Saffron Water) फायदेशीर ठरते.

Saffron Water Benefits
Monsoon Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'या' टिप्स

* केसरचे पाणी कसे तयार करावे?

  • केसरच्या 5 ते 7 काड्या घ्याव्या.

  • नंतर 10 मिनिटे गरम पाण्यात उकळून घ्यावे.

  • हे पाणी थोडे कोमट करून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com