चापोली धरण जलाशयात पाणीसाठा समाधानकारक

dainik gomantak
मंगळवार, 19 मे 2020

गेल्या वर्षी याच दिवशी जलाशयात ३१.७५ आर. एल. म्हणजे ५१८.७५ हेक्टर मीटर व २०१७ मध्ये याच दिवशी ३२.६५ म्हणजे ५८२.२५ हेक्टर मीटर जलसाठा होता. त्याशिवाय अर्धफोंड जल प्रकल्प व गावणे धरण जलाशयात गेल्या वर्षापेक्षा जास्त जल साठा आहे.

काणकोण, 

काणकोण तालुक्याची तहान भागवणाऱ्य मुख्य चापोली धरण जलाशयात गेल्या दोन वर्षाच्या मानाने यंदा अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षाच्या मानाने यंदा १.८९ आर. एल. जलसाठा चापोली धरण जलाशयात असल्याने पाणी समाधानकारक आहे, असे जलस्त्रोत खात्याचे काणकोणमधील सहाय्यक अभियंता आझाद वेर्णेकर यांनी सांगितले.
सद्यःस्थितीत आज (सोमवारी) जलाशयात ३३.६४ आर. एल. म्हणजेच ६६२.२२ हेक्टर मीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जलाशयात ३१.७५ आर. एल. म्हणजे ५१८.७५ हेक्टर मीटर व २०१७ मध्ये याच दिवशी ३२.६५ म्हणजे ५८२.२५ हेक्टर मीटर जलसाठा होता. त्याशिवाय अर्धफोंड जल प्रकल्प व गावणे धरण जलाशयात गेल्या वर्षापेक्षा जास्त जल साठा आहे. अर्धफोंड जलप्रकल्पाच्या डोहातील पाण्याची पातळी घालवल्यास गावणे धरण जलाशयातील पाणी अर्धफोंड प्रकल्पात वळवण्यात येते, असे त्यांनी सांगितले.

दरदिवशी नऊ ‘एमएलडी’ पाण्याचे शुद्धीकरण....
काणकोण जलशुद्धीकरण प्रकल्पात दरदिवशी नऊ ‘एमएलडी’ पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. मात्र, तालुक्याची पाण्याची गरज बारा एमएलडी आहे. सध्या चापोली धरण ते श्रीस्थळ जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी खेचून आणण्यासाठी १२० मीलिमीटर व्यासाची मोठी जलवाहिनी घालण्यात येत आहे. त्याशिवाय पाणी खेचण्यासाठी २४० अश्वशक्तीचे तीन मोटारपंप आणले आहेत. जलवाहिनी घालण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर तीन मोटारपंपने पूर्ण क्षमतेने पाणी खेचण्यात येणार आहे. श्रीस्थळ येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाची जलशुद्धीकरण क्षमता दिवसाकाठी १५ एमएलडी जलशुद्धीकरण करण्याची आहे. त्यामुळे काही दिवसांत काणकोणमधील पाणी समस्या मिटण्याची अपेक्षा जलपुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंते लेस्टर फर्नांडीस यांनी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या