Summer Recipe: उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी 'बडीशेप शरबत'चा आस्वाद

उन्हाळ्यात तुम्ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बडीशेपचे शरबत घेऊ शकता.
Summer Recipe: उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी
'बडीशेप शरबत'चा आस्वाद
Summer Recipe| Fennel SeedsDainik Gomantak

कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक अनेक प्रकारचे शरबत आणि घरगुती उपाय करतात. आयुर्वेदात बडीशेपपासून बनवलेल्या शरबतला आरोग्यदायी मानले जाते. ज्याचा वापर माऊथ फ्रेशनरपासून पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. बडीशेपच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मॅंगनीज सारखे महत्त्वाचे पोषक असतात. जे आरोग्यासाठी (Health) अनेक फायदे देतात.हे शरबत बनवायला जितके सोपे आहे तितकेच ते चवीला चविष्ट आहे. या सरबताचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव पूर्णपणे वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊया हे चविष्ट एका जातीचे बडीशेप सरबत कसे बनते आणि ते पिण्याचे आरोग्याला काय फायदे आहेत. (Fennel Seeds Benefits News)

बडीशेप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

बडीशेप 1/2 कप -

साखर चवीनुसार -

लिंबाचा रस - 2 चमचे -

काळे मीठ -1 टीस्पून

हिरवा रंग - 1 चिमूटभर

बर्फाचे तुकडे - 8-10बडीशेप सरबत बनवण्याची

* कृती

बडीशेपचे शरबत तयार करण्यासाठी सर्वातआधी बडीशेप स्वच्छ धुवून घ्या. यानंतर बडीशेप 2 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर बडीशेप पाण्यातून काढून मिक्सरमध्ये टाकून त्यात साखर, काळे मीठ चवीनुसार पाणी घालून बारीक करून घ्या. हा रस कापडाच्या साहाय्याने गाळून उरलेली बडीशेप पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. यानंतर पुन्हा एकदा कापडाने गाळून घ्या. यानंतर एका बडीशेपच्या शरबतामध्ये चिमूटभर खाण्याचा हिरवा रंग मिक्स करा. यानंतर सिरपमध्ये 2 चमचे लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करा. तयार आहे बडीशेपचे शरबत आता एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून थंडगार शरबत सर्व्ह करू शकता. .

Summer Recipe| Fennel Seeds
सूज कमी करण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती उपाय

* बडीशेप शरबत पिण्याचे फयदे

* बडीशेप शरबत पिल्याने पचनसंस्था निरोगी राहते.

* बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी आजारांपासून दूर ठेवते.

* शरीरातील डिटॉक्सिफाई आणि रक्त साफ करण्यास देखील मदत करते.

* बडीशेप शरबत डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

* बडीशेप शरबताचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.