गोव्यात सात नदी देवतांचे शिल्प आकारास

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

 देशातील ज्या सात मोठ्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या मूर्तींची कारागिरी गोव्यात आकारास आली आहे. त्यात गंगा, यमुना, सिंधु, सरस्वती, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी सात नदीदेवतांच्या मूर्ती प्रसिद्ध अशा शनि शिंगणापूर देवस्थान परिसरात स्थापन केल्या जाणार आहेत. 

पणजी : देशातील ज्या सात मोठ्या नद्या आहेत, त्या नद्यांच्या मूर्तींची कारागिरी गोव्यात आकारास आली आहे. त्यात गंगा, यमुना, सिंधु, सरस्वती, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी सात नदीदेवतांच्या मूर्ती प्रसिद्ध अशा शनि शिंगणापूर देवस्थान परिसरात स्थापन केल्या जाणार आहेत. 

एका मूर्तीला चार महिने असा २८ महिन्यांचा काल या सात नदीदेवतांच्या मूर्तीसाठी पट्टस्वामी गुडीगार यांना लागला आहे. लाकूड असोवा दगड त्यात जिवंतपणा आणण्याची कला गुडीगार यांचे पिढीजात कला आहे. 

गोव्यातील मंदिर निर्माते कमलाकर साधले आणि अभिजित साधले यांचे पट्टस्वामी मित्र. साधले यांचा शनि शिंगणापूर देवस्थान समितीशी चांगला संबंध आहे, या समितीकडून विचारणा झाल्यानंतर साधले यांनी गुडीगार यांचे नाव सांगितले. त्यामुळे त्या देवस्थान समितीने सात नदीदेवतांची शिल्प बनविण्याचे काम गुडीगार यांच्याकडे सोपविले. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतून स्वेच्छानिवृत्तीनंतर वार्धक्याकडे वळत असले तरी कलेच्या रुपे पट्टस्वामी यांनी स्वतःला तरुण ठेवले आहे. पट्टस्वामी हे नाव ऐकलं, तेव्हा झर्रकन डोळ्यासमोरून विनय आपटे यांनी ‘गोलमाल'' या चित्रपटात सांगितलेल्या नावाची आठवण झाली. एवढ्या मोठ्या लाबंलचक नावाशी या गुडीगार यांचा काही संबंध नाही, पण हे गुडीगार कुटुंब तसे गोव्यात कदंब राज्याच्या काळापासून वास्तव्यास आहे. मूर्तीकार म्हणजे गुडीगार, गोव्यात गुडीपारोडा हे त्यांचे मूळ गाव. पोर्तुगीज काळात जी बाटाबाटी सुरू झाली, त्याकाळात अल्पसंख्यांक असलेला हा गुडीगार समाज पुन्हा आपल्या कर्नाटकातील चंद्रपूरात निघून गेला. १९८१ मध्ये पट्टस्वामी यांना राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत नोकरी मिळाली, तेव्हा ते गोव्यात परतले. तसे त्यांचे कुटुंब मोठे आहे. इतर चार भाऊ आपला कलाकुसरीचा व्यवसाय बंगळुरूमध्ये सांभाळत आहेत. 

सरकारी नोकरीत असली तरी पारंपरिक कलाकुसरीचे काम पट्टस्वामी यांनी सोडले नाही. २००२ मध्ये त्यांनी या कलेमुळे सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि २००३ मध्ये त्यांनी ‘शिल्पलोका‘ हा कलाकुसरीचा व्यवसाय वेर्णा औद्योगिक वसाहतीत सुरू केला. पट्टस्वामी यांनी बनविलेली सात फूट उंचीची ब्राँझची (तांबा) नटराजाची छोला पद्धतीची मूर्ती राजभवनात पहायला मिळते. त्याशिवाय २००७ मध्ये त्यांनी ‘कदंबा शिल्पशिबिर''चे आयोजनही त्यांनी केले होते. कर्नाटक सरकराने त्यांना २०१२ मध्ये ‘कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार'' देऊन गौरविले आहे. 
 

संबंधित बातम्या