जपानी नागरिकांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याचं नेमकं रहस्य आहे तरी काय?

गोम्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

जपानमधील लोक संपूर्ण जगातील सर्वात प्रदीर्घ आणि आरोग्यवर्धक जीवन जगतात. 112 वर्षीय जपानच्या चितेसु वताना यांनी जगातील सर्वात  वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीच बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. 

जपानमधील लोक संपूर्ण जगातील सर्वात प्रदीर्घ आणि आरोग्यवर्धक जीवन जगतात. 112 वर्षीय जपानच्या चितेसु वताना यांनी जगातील सर्वात  वयस्कर व्यक्ती म्हणून गिनीच बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं होतं. जपानमधील महिलांचे सरासरी वय 86 वर्षे आहे तर पुरुषांचे सरासरी वयोमान 80 च्या आसपास आहे. भारतातील लोकांचे सरासरी वय 69.16 आहे.  आपण जपानी लोकांचे दीर्घ आयुष्य जगण्याचं रहस्य समजून घेऊ

1. खाण्याच्या सवयी

 जपानमध्ये नागरिक निरोगी राहण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे हे लोक कधीही पोटभर अन्न खात नाहीत. हे लोक  फक्त 80 टक्के पोट भारतात. सामान्यत: मेंदूला शरीरातून पोट भरलं आहे आता खाणं थांबवावं हा सिग्नल मिळण्यासाठी 20 मिनिटे लागतात. हा सिग्नल मिळाल्या नंतरही जे लोक खातात त्यांचं पोट जड होतं. परंतु जपान मधील लोक पोट भरताच खाणं थांबवतात. 

2. स्वच्छता आणि चांगली आरोग्य सेवा  

जपानची आरोग्य सेवा प्रणाली खूप प्रगत आहे. नियमित तपासणीसाठी प्रत्येक प्रकारच्या लसीकरण कार्यक्रमास तेथे अत्यंत गांभीर्याने घेतले जाते. इथले लोक स्वच्छता हे त्यांचं नैतिक कर्तव्य मानतात.

3. चहा पिण्याची परंपरा

जपानी लोकांना चहा पिण्यास खूप आवडते. त्याची 'माचा' चहाची परंपरा जगभरात प्रसिद्ध आहे. ग्रीन टीच्या पानांपासून बनवलेल्या या चहामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते, पचन क्रिया सुलभ राहते. हा चहा वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो. 

4. जपानी खाद्य 

जपानी भोजन संतुलित आणि अनेक पौष्टिक पदार्थांनी परिपूर्ण असते. ते हंगामी फळे, ओमेगा फिश, तांदूळ, संपूर्ण धान्य, टोफू, सोया आणि हिरव्या कच्या भाज्या खातात. ज्यात बरिच जीवनसत्वे असतात.  यामुळे कर्करोग आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. हे भोजन पचण्यास अत्यंत सुलभ असते.

5.   चालण्याचा व्यायाम
जपानमधील लोकांना जास्त वेतन बसायला आवडत नाही आणि ते बरेच चालतात. इथल्या तरूणापासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना चालण्याची सवय आहे. इथले बरेच लोक महाविद्यालय, कार्यालयातदेखील चालतच जातात. 

6. इकिगाई मंत्र

जपानमधील लोक इकिगाई मंत्राद्वारे आपले जीवन जगतात. या मंत्राचा उद्देश जीवनाचा हेतू शोधणे आहे. इतरांना मदत करणे, चांगले खाणे, मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे आणि अनावश्यक तणावापासून दूर राहणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इथल्या लोकांचा आनंद दडलेला असतो. या सगळ्या गोष्टी दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी महत्वाच्या आहेत.

संबंधित बातम्या