मासिक पाळी दरम्यान लस घ्यावी की नाही ?

Should I get vaccinated during menstruation?
Should I get vaccinated during menstruation?

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याकरिता सरकार, वैदयकीय यंत्रणा वेगाने पावले उचलत आहेत. येत्या 1 मेपासून कोरोना लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षावरील प्रत्येकाला कोरोनाची लस दिली जाणार आहे.

महिलांनी मासिक पाळी दरम्यान कोरोनाची लस घ्यावी की नाही, याबद्दल अनेक अफवा उडाल्या आहेत. यावर महिलांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. लसीकरणाचा मासिक पाळीवर परिणाम होतो का असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे. चला तर जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर...(Should I get vaccinated during menstruation?)

लसीकरणचा मासिक पाळीवर परिणाम होतो का ? 

सोशल मिडियावर (Social Media) अनेक अफवा पसरत आहेत. मासिक पाळी (menstruation)  दरम्यान आपली रोगप्रतिकरक क्षमता कमी झालेली असते. लासीचा पहिला डोस आपली रोगप्रतिकरक क्षमता कमी करते आणि मग हळूहळू रोगप्रतिकरक क्षमता वाढवते. त्यामुळे मासिक पाळी दरम्यान लस घेतल्यास कोरोना संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लस घेऊ नका असे अनेक संदेश सोशल मीडियावर प्रसारित झाले होते पण हा दावा फेक आहे. असे पीआयबी (PIB) ने स्पष्ट केले आहे. त्यामूळे सरकारने  देखील आवाहन केले आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. 

मासिक पाळी आणि कोरोना लस यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असे तज्ञांचे मत आहे. मासिक पाळी सुरू असताना लस घेण्यास काहीच अडचण नाही. मासिक पाळी ही नैसर्गिक गोष्ट आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लस घेतली तरी चालणार आहे. माहामारीच्या काळात अनेक महिल्या या कामानिमित्याने घराबाहेर पडत असतात. सर्वानाच वर्क फ्रॉम होम (Work From Home) करणे शक्य नाही. त्यामुळे महिलांनी लस घ्यायला पाहिजे असे तज्ञांचे मत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com