
Things To Do On Friday: आठवड्यातला प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. आजचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे.
आज देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्यास काय होईल हे सांगायची गरज नाही. मात्र देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच आणखीनही काही उपाय आहेत, जे केल्यास आर्थिक समस्येतून तुमची सुटका होऊ शकते. काय आहेत ते उपाय हे आपण पाहाणार आहोत.
शुक्रवारी करा हे उपाय
1. कमळाचे फूल अर्पण करा
शुक्रवारी सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे. यासोबतच माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून कमळ फूल अर्पण करावे.
शंख आणि घंटा यामध्ये देवी लक्ष्मी निवास करते असे मानले जाते. म्हणूनच पूजा करताना शंख आणि घंटा नाद करावा, असे केल्यास ही पूजा सफल झाली असे मानले जाते
2. साखरेचे महत्व
तुमच्या प्रत्येक कामात काही अडथळे येत असतील तर माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच शुक्रवारी काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घालावी. याचा फायदाही तुम्हाला मिळेल.
3. या मंत्रांचा जप करा
शुक्रवारी भगवान शुक्राला प्रसन्न करण्यासाठी यापैकी कोणत्याही एका मंत्राचा सुमारे 108 वेळा जप करा - ओम शुं शुक्राय नम: किंवा ओम हिमकुंडमृणालाभन दैत्यानान परम गुरुं सर्वशास्त्र प्रवर्तकं भार्गवम् प्रणमायहन.
4. पांढऱ्या वस्तू दान करा
शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान कराव्या. कारण हा रंग माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच शुक्रवारी पांढरे वस्त्र, तांदूळ, मैदा, साखर, दूध, दही इत्यादींचे दान करावे.
5. कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा
कडुलिंबाला माता दुर्गेचे रूप मानले जाते. यासोबतच ग्रह दोषांपासूनही सुटका मिळते. म्हणूनच शुक्रवारी सकाळी स्नान केल्यानंतर कडुलिंबाच्या झाडाला जल अर्पण करावे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.