Single Use Plastic Ban: 'प्लास्टिक फ्री जुलै' मोहीम

Single Use Plastic Ban Goa: एखादाच महिना ‘प्लास्टिक फ्री’ (Plastic Free) म्हणून साजरे करण्यापेक्षा, आता शर्थीने आपला दर दिवस ‘प्लास्टिक फ्री’ बनवण्याची आणीबाणी जवळ येऊन ठेपली आहे.
Single Use Plastic Ban |Goa
Single Use Plastic Ban |Goa Dainik Gomantak

'प्लास्टिक फ्री जुलै’ या मोहीमेबद्दल आपल्याला काही ठाऊक आहे का? गेली दहा वर्षे जगभर ही मोहिम चालली आहे. या महिन्यात प्लास्टिकला नाकारण्यासंबंधी विविध उपक्रम हातात घेतले जातील कलाविष्कार सादर होतील. प्लास्टिकला नकार जितक्या वेगवेगळ्या पद्‍धतीने अधोरेखीत करता येईल तितक्या पद्धतीने केला जाईल. ऑस्ट्रेलियन रिबेका प्रिन्स रुईझ यांनी 2011 या वर्षी सुरु केलेली ही चळवळ आता जगभर पोहोचली आहे. हे एक लहानसे पाऊल असले तरी प्लास्टिकच्या भस्मासुराला आवर घालण्यासंबंधी हे पाऊल आपल्याला अधिक तिव्रतेने आठवण करुन देते. (single use plastic ban Goa news)

खरं तर आमच्या देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने 1 जुलैपासून ‘सिंगल युज प्लास्टिक’ (single use plastic) वर बंदी जाहीर केली आहे. राज्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. पण आता जुलै सुरु झालेल्याला काही दिवस उलटून गेलेले असले तरी बाजारात ‘सिंगल युज प्लास्‍टिक’ चा आब अजून कमी झालेला नाही.

राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही ‘कठोर कारवाई’ केल्याचे अजून तरी ऐकिवात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले होते, त्यांनी गोव्याच्या (Goa) बाजाराचे सर्वेक्षण केलेले असून असे प्लास्टिक वापरणाऱ्या घाऊक विक्रेत्यांची आणि वितरकांची नोंद करुन ठेवली आहे. पाटील यांनी हे ही सांगितले होते की घाऊक विक्रेते आणि वितरक यांच्यावर प्रथम कारवाई करणे अशासाठी आवश्यक आहे, की त्यामुळे ‘पुरवठा साखळी’ तुटण्यास मदत होऊ शकेल आणि त्याचबरोबर किरकोळ विक्रेत्यांना ‘सिंगल युज प्लास्टिक’ वर घातलेल्या बंदी संबंधीची माहिती देऊन त्यांना यासंबंधाने जागरुक करण्यात येईल.

Single Use Plastic Ban |Goa
गोवा इन्स्टिट्युट मॅनेजमेंटला आंतरराष्ट्रीय ‘एम टू फ्लरिश’ चे विजेतेपद

खरतर प्लास्टिकच्या धोक्याबद्दल लोकांना आता इतकी माहिती झाली आहे की प्लास्टिकचा वापर कमीत कमी व्हावा यादृष्टीने नागरीकांनीही आपणहून प्रयत्न करायला सुरुवात केली पाहीजे परंतू भाजीच्या किंवा मासळीच्या बाजारात पिशवीशिवाय जाणाऱ्यांची आणि विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशवीची अपेक्षा करणाऱ्यांची संख्या पाहिली तर प्लास्टिक आपले वर्चस्व कसे राखून आहे याचाच दाखला मिळतो.

इथेतिथे विखरून असलेल्या प्लास्टिकचा अंश आज साऱ्या प्राणिमात्रांच्या शरीरात सापडला जात आहे. मानवाने घडवलेला हा असूर आता शरिराचाच भाग बनत चालला आहे. एखादे दिवस आपणच ‘कचकडी’ बनलो नाही म्हणजे मिळवली. एखादाच महिना ‘प्लास्टिक फ्री’ (Plastic Free) म्हणून साजरे करण्यापेक्षा, आता शर्थीने आपला दर दिवस ‘प्लास्टिक फ्री’ बनवण्याची आणीबाणी जवळ येऊन ठेपली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com