Health Tips: एकाच जागी बसून काम करताय? वेळीच घ्या काळजी

Sitting All Day is Harmful: दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. यामुळे आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवतात.
Health Tips
Health TipsDainik Gomantak

Sitting All Day is Harmful: निरोगी आरोग्यासाठी शरीराची हालचाल होत राहणे फार गरजेचे आहे. व्यायामामुळे शरीराची हालचाल होते आणि निरोगी राहण्यास मदत होते.

निरोगी शरीरासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. हालचाल न करता एका जागी स्थिर बसल्यामुळे अनेक समस्यांना आमंत्रण मिळते. दिवसभर एका जागी बसण्याचा आरोग्यावर फार वाईट परिणाम होतो. यामुळे आरोग्यसंबंधित (Health) अनेक समस्या उद्भवतात.

  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत

एका संशोधनानुसार दिवसभर बसून राहण्याचा शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. स्थिर बसून शरीरावर होणारा परिणाम टाळण्यासाठी दर अर्ध्या तासाला शरीराची हालचाल होणे गरजेचं आहे.

यासाठी तुम्ही दर अर्ध्या तासाने किमान पाच मिनिटे चालण्याची सवय करून घ्यावी. जर्नल मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

या रिपोर्टनुसार दर अर्ध्या तासाने पाच मिनिटे चालल्याने रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

  • रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर

जर्नल मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइजकडून याबाबत एक संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात 11 मध्यमवयीन व्यक्ती आणि वृद्धांचा समावेश करण्यात आला.

या संशोधनात असे आढळून आले की, दर अर्ध्या तासाने पाच मिनिटे चालण्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे प्रमाण 60 टक्के कमी होते.

याच्या तुलनेत दिवसभर बसण्याऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 4 ते 5 टक्के होते. नियमितपणे शरीराची हालचाल केल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. दर तासाला एक मिनिट चालल्याने रक्तदाबही 5 टक्के कमी झाल्याचेही संशोधनात (Research) आढळले.

Health Tips
Research: वृद्धांना पुन्हा येणार तरुणपण, हार्वर्डच्या शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
  • मानसिक आरोग्यासाठी चांगले

वेळोवेळी शरीराची हालचाल केल्याने शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही (Mental Health) चांगला परिणाम होतो. या संशोधनात आढळेले की, दिवसभर बसून काम करण्याऐवजी दर अर्ध्या तासाला पाच मिनिटे चालल्याने व्यक्तींना कमी थकवा जाणवत होता.

त्याचा मूडही (Mood) चांगला होता. चालण्यामुळे त्यांना अधिक ऊर्जा मिळाली. या संशोधनाच्या अहवालानुसार दर तासाला थोडे चालणे यामुळे मूड सुधारू शकतो. थकवाही कमी होतो आणि रक्तदाब तसेच रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते, हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

  • चालण्याचे फायदे

अधिक वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मधुमेह आणि हृदयविकारासंबंधित अनेक गंभीर आजारांना बळी पडण्याचा धोका जास्त असतो. जे लोक दिवसभर बसून काम करतात त्यांना वेळोवेळी शरीराची हालचाल करण्यासाठी चालणाऱ्या लोकांना सतत बसून राहणाऱ्यांच्या तुलनेने आजारांचा धोका कमी होतो.

तसेच कमी शारीरिक हालचालीमुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो, असंही शास्त्रज्ञांचे मत आहे. सतत बसण्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी तुम्ही योगासने करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com