Skin Care Tips: बॉडी वॉश की साबण? त्वचेसाठी काय चांगले

आपले शरीर स्वच्छ व्हावे आणि आपल्याला दिवसभर फ्रेश वाटावे यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो.
Skin Care Tips: बॉडी वॉश की साबण? त्वचेसाठी काय चांगले
Skin Care Tips: Body Wash Soap? What good for the skin Dainik Gomantak

बॉडी वॉश (Body Wash) आणि साबण (Soap) यात काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेक लोकांना साबणाने आंघोळ करणे आवडते, तर अनेकांना बॉडी वॉशने आंघोळ करायला आवडते. आपले शरीर स्वच्छ (clean) व्हावे आणि आपल्याला दिवसभर फ्रेश (Fresh) वाटावे यासाठी आपण या गोष्टींचा वापर करतो. साबण (Soap) आणि बॉडी वॉश (Body Wash) वापरण्याचे कोणते फायदे आहेत जाणून घेवूया सविस्तरपणे.

अनेक लोकांना जास्त फोम असलेल्या पाण्यात आंघोळ करायला आवडते. जर फोम नसेल तर आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. अशा लोकांनी बॉडी वॉशचा वापर करावा. यात अनेक प्रकार आहेत जे बाजारात सहज मिळतील. लुफाचा वापर केल्याने बॉडी वॉश संपूर्ण शरीरावर पसरते. यामुळे दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते.

Skin Care Tips: Body Wash Soap? What good for the skin
Skin Care Tips : हातावरील टॅनिंग कमी करायची असेल तर ...

साबण वापरल्याने अनेक लोकांची त्वचा कोरडी पडते. पण बॉडी वॉशचा वापर केल्याने त्वचा नाजुक आणि मऊ होते. अनेक बॉडी वॉशमध्ये हायड्रेटिंग आणि मॉइस्चरायझिंग गुणधर्म असतात. ज्या लोकांची त्वचा साबण वापरल्याने कोरडी पडते त्या लोकांनी बॉडी वॉशचा वापर करावा. तसेच अनेक शॉवर जेल तुम्ही चेहऱ्यावर देखील वापरू शकता.

आंघोळ करतांना लुफाचा वापर केल्याने त्वचेवरील डेड स्कीन निघून जाण्यास मदत मिळते. तसेच त्वचेमधील घाण साफ होऊन त्वचा निरोगी आणि स्वच्छ होते.

Skin Care Tips: Body Wash Soap? What good for the skin
Skin care: परफ्यूम लावताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा...

प्रवासात साबणापेक्षा बॉडी वॉश नेण्यास सोईस्कर असते. कारण साबण वापरल्यानंतर प्रत्येकवेळी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे लागते. परंतु बॉडी वॉशबद्दल असे होत नाही. यामुळेच प्रवासात बॉडी वॉश नेणे सोपे जाते. बॉडी वॉशला कमी जागा लागत असल्याने तुम्ही आपल्या पर्समध्ये ठेवू शकता.

Dainik Gomantak

आंघोळ करतांना बॉडी वॉश कमी प्रमाणात वापरला जातो. यामुळेबॉडी वॉश तुम्हाला अधिक काळ जावू शकते. बॉडी वॉश आणि साबण हे दोन्हीं प्रकार आपल्या त्वचेसाठी चांगले आहे. पण आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार बॉडी वॉश किंवा साबणची निवड करावी.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com