फेशियल केल्यानंतरही ग्लो नाही..

अनेक वेळा महागडे फेशियल करून देखील चेहऱ्यावर ग्लो दिसत नाही, यासाठी आपल्या त्वचा प्रकारानुसार चेहऱ्यावर वाफ घ्यावी.
फेशियल केल्यानंतरही ग्लो नाही..
फेशियल केल्यानंतरही ग्लो नाही.. Dainik Gomantak

प्रत्येक महिलेला चमकदार त्वचा (skin) हवी असते. यासाठी महिला फेशियल किंवा क्लीनअप (Clean Up) करतात. पण बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल की महागडे फेशियल (Facials) करून देखील चेहऱ्यावर चमक येत नाही. यामागील कारण म्हणजे आपल्या त्वचेचा (Skin) प्रकार कोणता हे समजून घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यावर चमक (Glow) आणण्यासाठी, आपल्याला त्वचेचा प्रकार कोणता आहे हे समजणे आवश्यक आहे. फेशियलनंतर कोणत्या प्रकारची स्टीम (Steam) घ्यावी हे त्वचा प्रकारानुसार ठरवावे.

* कोरडी त्वचा

त्वचा जर कोरडी असेल तर सुरकुत्या अधिक वाढतात. यामुळे यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडू शकते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर फेशियाल करताना आपल्या त्वचा प्रकारानुसार फेशियल करावे. तसेच चेहऱ्यावर 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाफ घेवू नये. आठवड्यातून एकदा स्टीम घ्यावी. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर पाण्यात गुलाबजलसह रोजमेरी अआणि बडिसोप घालीन वाफ घ्यावी. तुमी यामध्ये पुदीण्याची पाने देखील घालू शकता. यामुळे तुमच्या त्वचेवर चमक येवू शकते.

* तेलकट त्वचा

तेलकट त्वचेचे प्रमाण तरुण मुलींमध्ये अधिक आढळून येते. यामुळे चेहऱ्यावर मुरूम, पीपल्स येतात. यावर तुम्ही उपाय म्हणून पाण्यात लेमन ग्रास, लैव्हेंडर आणि रोझमेरी टाकून वाफ घेवू शकता. यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होऊन त्वचा चमकदार दिसते.

फेशियल केल्यानंतरही ग्लो नाही..
Weight Loss Juice: वजन कमी करण्यासाठी प्या "हे" घरगुती ज्यूस 

* मिश्र त्वचा

मिश्र त्वचा प्रकार असलेल्या महिलांनी योग्य वाफ घेतल्यास चेहऱ्यावर अधिक चमक येते. स्टीम करण्यापूर्वी डोळ्याभोवती व्हिटॅमिन ई आणि ए कॅप्सूल लावा आणि नंतर स्टीम घ्यावी. यामुळे त्वचा मऊ होऊन चमकदार दिसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com