Basil Leaves For Skin: ग्लोइंग स्किनसाठी बहुगुणी 'तुळस' फायदेशीर, असा करा वापर

आरोग्यासाठी नव्हे तर त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते तुळस
Basil Leaves For Skin Care
Basil Leaves For Skin CareDainik Gomantak

Basil Leaves For Glowing Skin: भारतात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात बरेच लोक तुळशीच्या रोपाची पूजा करतात. घरात तुळशीचे रोप असणे शुभ मानले जाते. पौराणिक महत्त्वाव्यतिरिक्त तुळस हे एक औषधीयुक्त वनस्पती आहे.

शरीराच्या अनेक समस्या याच्या वापराने दूर केल्या जाऊ शकतात आणि ही औषधी वनस्पती त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

तुळशीमुळे (Basil) तुमच्या त्वचेशी (Skin) संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. तुमची त्वचा तेलकट असो वा कोरडी असो किंवा मुरुम असोत, या सर्व समस्यांसाठी तुळस तुमच्यासाठी प्रभावी उपाय ठरू शकते. तुळशीच्या पानांमुळे तुमच्या त्वचेला कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया.

1. त्वचा स्वच्छ करते

तुळशीच्या पानांमध्ये असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेतील अतिरिक्त घाण बाहेर काढून टाकण्यास आणि चेहऱ्यावरील छिद्रे बंद करण्यास मदत करतात. ते त्वचेवर नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करतात. 

तेलकट त्वचा असलेल्या लोकांसाठी तुळशीची पाने फायदेशीर असतात. कारण ते त्वचेवरील घाण काढून स्वच्छ करतात. तुम्ही घरीच (Home) तुळशीचा फेस मास्क (Face Mask) बनवून तुमच्या त्वचेवर लावू शकता. तुळशीचे पाने स्वच्छ धुवून बारीक पेस्ट तयार करावी. नंतर त्यात ताजे दही मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावावी. 

2. मुरुमांवर उपचार करते

तुळशी मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी देखील प्रभावी आहे. कारण ते अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे चेहऱ्यावरील (Face) अतिरिक्त तेल काढून टाकते आणि पिंपल्समुळे होणारी जळजळ देखील कमी करते.

Glowing Skin
Glowing SkinDainik Gomantak

3. ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर

तुळस चमकदार त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे तुमच्या त्वचेचे प्रदुषण, अतिनील किरण आणि संक्रमणांपासून संरक्षण करण्यासाठी कार्य करते. यात डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेला चमकदार बनविण्यास मदत करतात. 

4. ब्लॅकहेड्स कमी करते

ब्लॅकहेड्समुळे अनेकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुळशी बॅक्टेरिया आणि जळजळ यांच्याशी लढण्यास मदत करते. 

त्यात कॅम्फेन असते, जे नैसर्गिक त्वचा टोनर म्हणून काम करते. तुळशी फक्त ब्लॅकहेड्सच नाही तर व्हाईटहेड्स देखील दूर करते. 

त्याचा फेस पॅक बनवण्यासाठी 25 ते 30 तुळशीची पाने आणि तेवढीच कडुलिंबाची पाने घ्या. त्यांना चांगले बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर एक चमचा मध घाला. हे तुमच्या त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com