Stretch Marks कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

तुम्हाला जर स्ट्रेच मार्क्सची समस्या असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
Stretch Marks कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय
Stretch Marks कमी करण्यासाठी करा हे घरगुती उपाय Dainik Gomantak

गर्भधारणेनंतर सामान्यत: स्त्रियांमध्ये स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks) दिसतात. तर अचानक वजन वाढणे किंवा वजन कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. केवळ महिलांनाच याचा त्रास होत नाही तर पुरुषांनाही या समस्येला सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी स्वस्त आणि सुरक्षित घरगुती उपाय आपण करून पाहू शकतो. चला तर मग जाणून घेवूया घरगुती उपाय कोणते आहेत.

* कोरफड

कोरफड हे एक नैसर्गिक उपचार एजंट म्हणून काम करते. कोरफड जेल स्ट्रेच मार्क्स आलेल्या भागावर लावावे. 30 ते 30 मिनिटानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. नियमितपणे असे केल्यास काही दिवसांमध्येच स्ट्रेच मार्क्स कमी होतील.

* साखरेपासून तयार केलेले स्क्रब

स्ट्रेच मार्क्स आलेल्या भागावर साखरेचे स्क्रब लावल्यास कमी होते. स्क्रब तयार करण्यासाठी 1/4 कप बदाम तेल किंवा खोबरेल तेलामध्ये एक कप साखर मिक्स करावी. यात थोडा लिबाचा रस घालावा. आंघोळीपूर्वी आठवड्यातून 2 ते 4 वेळा स्क्रब करावे. या स्क्रबने 8 ते 10 मिनिटे मसाज करावी.

*नारळाचे तेल

नारळामध्ये अनेक पोषक घटक असतात. नारळाच्या तेलामुळे त्वचा मऊ होते. तसेच स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर नारळाचे तेल लावल्यास कमी होतात.

* काकडी आणि लिंबाचे मिश्रण

लिंबाचा रस त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मदत करते. काकडीच्या रसामुळे त्वचा ब्लीच होण्यास मदत मिळते. तसेच चेहरा फ्रेश दिसतो. लिंबाचा रस आणि काकडीचा रस सम प्रमाणात मिक्स करावे. हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स आलेल्या भागावर लावावे. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे.

Related Stories

No stories found.