कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही? जाणून घ्या काय आहेत कारणं

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

बरेच लोक भरपूर अन्न खातात पण तरीही त्यांचे वजन वाढत नाही. अशा लोकांना पाहून अनेकदा आश्चर्यय वाटतं. त्यांचं वजन न वाढण्याचं कारण काय आहे? 

बरेच लोक भरपूर अन्न खातात पण तरीही त्यांचे वजन वाढत नाही. अशा लोकांना पाहून अनेकदा आश्चर्यय वाटतं. त्यांचं वजन न वाढण्याचं कारण काय आहे? चला त्यामागील कारण समजून घेऊ. पौष्टिक आहाराबरोबर निरोगी राहण्यासाठी वर्कआउटकडेही लक्ष दिले पाहिजे, असे आपल्याला नेहमी सांगितले जाते. परंतु आपण सर्व जण अशा एका तरी व्यक्तीला ओळखतच असतो, जो पिझ्झा, डोनट्स आणि विविध प्रकारचे फास्ट फूड खाऊनही त्याचं वजन वाढत नाही. ही गोष्ट लोकांना बर्‍याच वेळा आश्चर्यचकित करते की इतके खाऊनही एखादी व्यक्ती एवढी स्लिम कशी असू शकते. आपण स्लिम फिट बॉडीचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करू.

एखाद्या व्यक्तीची चयापचय क्रिया हे वजन न वाढण्यामागील कारण असू शकतं. यामागे आणखी बरीच कारणे असू शकतात. अनुवांशिक, पोषण, शरीराची ठेवण  इत्यादीमुळे काही व्यक्तींचं शरीर सडपातळ राहतं. प्रत्येक माणूस वेगळा असतो आणि त्याचे वजन त्याच्या डेली रुटीनवर अवलंबून असतं. कोणत्याही व्यक्तीचे वजन वाढण्याचे कारण त्यांच्या कॅलरी इनटेक च्या संख्येवर आणि दिवसात किती कॅलरीज बर्न झाल्या यावर अवलंबून असतं.

शारीरिक दृष्ट्या सक्रिय

शारीरिक हालचाल हे कमी वजन असण्या मागचं कारण असू शकतं. शारीरिक हालचाल म्हणजे फक्त जिममध्ये वेळ घालवणे नव्हे. आपण कदाचित दिवसभर घरातील कामात व्यस्त असाल. बर्‍याच अभ्यासानुसार, काही लोक त्यांच्या जननेंद्रियामुळे सहज वजन कमी करतात. या व्यतिरिक्त, काही लोक शारीरिकदृष्ट्या इतके सक्रिय असतात की कोणत्याही कसरतशिवाय ते पुरेशी प्रमाणात कॅलरी कमी करतात. त्याच वेळी, काही लोक व्यायाम करतात आणि वेटलॉस करतात.

 अनुवांशिकांची भूमिका

वजन कमी करणे आणि वजन वाढविण्यात अनुवंशशास्त्र मुख्य भूमिका बजावते. पीएलओएस जेनेटिक्समध्ये प्रकाशित झालेल्या 2019 च्या अभ्यासानुसार 250 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रदेशातीळ लठ्ठ लोकांचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासासाठी, संशोधकांनी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) चांगलं असलेल्या 1622 निरोगी लोकांचा , 1,985 लठ्ठ आणि 10,433  सामान्य वजन असलेल्या लोकांचा अभ्यास केला. यामध्ये लठ्ठपणा अथवा कमी वजन असणे हे पूर्णपणे जीन्सवर(जनुके) अवलंबून नसून, आपली जीवनशैली, झोपेची पद्धत, खाण्या पिण्याच्या सवयी यावर देखील अवलंबून असते. आपण वजन वाढवू इच्छित असाल, तर पौष्टिक खा आणि नियमित व्यायाम करा. आपल्या जीवनशैलीत गरजेचे बदल करा. हे आपले वजन वाढवण्यास मदत करेल आणि आपले आरोग्य सुधारेल.
 

संबंधित बातम्या