
ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या राशीच्या आधारावर त्यांच्या स्वभावाची ओळख केली जाते. तर सामुद्रिक शास्त्र व्यक्तीच्या शरीराच्या अवयवांचा आकार, रंग, शरीराच्या खुणा इत्यादींच्या आधारे ओळखले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची रचना वेगळी असते आणि त्यावर त्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य अवलंबून असते. आज अशा मुलींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या गालावर खळी पडते. मुलींच्या गालावर पडणारे डिंपल त्यांच्या सौंदर्यामध्ये आणखी भर पडते. गालांच्या टेक्सचरच्या आधारे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया.
* ज्या मुलींच्या गालावर डिंपल्स असतात त्या खूप भाग्यवान असतात. तसेच त्यांची आर्थिक स्थिती इतर मुलींच्या तुलनेत चांगली असते. या मुलींना आयुष्यात खूप आनंद मिळतो. तसेच या मुलींचे आयुष्य लग्नानंतरही आनंदी राहते.
* गालावर काळे तीळ असणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात. जीवनातील प्रत्येक कामात त्यांना यश मिळतं. तेच पुरुषांच्या गालावर काळे तीळ असणे शुभ मानले जात नाही. सामुद्रिशास्त्रात हे अशुभ मानले जाते.
* ज्या लोकांचे गाल खोलगट किंवा खाली बसलेले असतात, त्या लोकांबद्दल असे म्हटले जाते की या लोकांना कौटुंबिक सुख मिळत नाही. ते या बाबतीत भाग्यवान नसतात.
* गुलाबी आणि गुबगुबीत गाल असणारे लोक सुद्धा भाग्यवान मानले जातात. असे लोक आनंदी जीवन जगतात. हे लोक जे काही काम करतात त्यात यश मिळते. तसेच हे लोक एखादे काम पूर्ण करूनच श्वास घेतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.